गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांचे मॉर्निंग रुटिन

google ceo sunder pichai morning routine : गूगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचई भारतीय वंशाचे आहेत. ते १० जून २०२२ रोजी पन्नाशीचे झाले.

google ceo sunder pichai morning routine
गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांचे मॉर्निंग रुटिन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांचे मॉर्निंग रुटिन
  • यशासाठी निश्चित असा दिनक्रम ठरवून मुलांनी बालपणापासूनच तयारी करावी, अशी अनेक आईवडिलांची इच्छा असते
  • सुंदर पिचई यांचा अनेक वर्षांपासून ठरला आहे दिनक्रम

google ceo sunder pichai morning routine : गूगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचई भारतीय वंशाचे आहेत. ते १० जून २०२२ रोजी पन्नाशीचे झाले. त्यांचा जन्म १० जून १९७२ रोजी तामीळनाडूतील मदुराई जिल्ह्यात झाला. त्यांनी आयआयटी खरगपूर येथून बीटेक आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस केले आहे. सुंदर यांचा दिनक्रम आजही त्यांच्या पालकांनी दिलेल्या संस्कारांवर आधारित आहे. भारताबाहेर अमेरिकेत असूनही अनेक वर्षे झाली सुंदर पिचई यांचा दिनक्रम ठरला आहे. 

सर्व आईवडिलांची इच्छा असते की त्यांची मुलं मोठी झाल्यावर यशस्वी व्हावीत. या यशासाठी निश्चित असा दिनक्रम ठरवून मुलांनी बालपणापासूनच तयारी करावी, अशीही अनेक आईवडिलांची इच्छा असते. सुंदर पिचई यांच्याही आईवडिलांची इच्छा मुलाने यशस्वी व्हावे अशीच होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी निश्चित असा दिनक्रम ठरवून सुंदर पिचई यांनी तयारी सुरू केली. आज ते गूगल या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीचे सीईओ आहेत.  जाणून घेऊ सुंदर पिचई यांचा दिनक्रम...

सुंदर पिचाई यांनी Recode साठी २०१६ मध्ये एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी स्वतःचा अनेक वर्षांपासून कायम असलेला दिनक्रम जाहीर केला होता. ते दररोज सकाळी ६.३० ते ७ दरम्यान उठतात. ब्रश करून फ्रेश होऊन एक कप चहा पितात. चहा सोबत नाश्ता करुन घेतात. चहासोबत सुंदर पिचई यांना ब्रेड आम्लेट, आम्लेट, ब्रेडटोस्ट हे पदार्थ खाण्यास आवडतात. 

सततच्या कामाच्या व्यापातून थोडा वेळ निवांतपणा मिळावा म्हणून सुंदर पिचई सकाळी व्यायाम करणे टाळतात. सकाळच्या वेळी चहा-नाश्ता करत वृत्तपत्र वाचणे त्यांना आवडते. वृत्तपत्र वाचन तसेच चहा-नाश्ता आटोपल्यानंतर सुंदर पिचई दिवसभराच्या कामासाठी झटपट तयारीला लागतात. संध्याकाळी कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून व्यायाम करण्यासाठी सुंदर पिचई आवर्जून प्रयत्न करतात. अमेरिकेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असले तरी सुंदर पिचई आजही आवडीने दक्षिण भारतीय पदार्थ खातात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी