नवी दिल्ली: Broccoli coffee For Weight Loss: आजकाल धावपळीच्या दैनंदिन जीवनात वजन वाढणं (Weight gain) ही समस्या सामान्य झाली आहे. तसंच वाढलेलं वजन कमी करण्यासाठी ही अनेक पर्याय आहेत. शरीरातील वाढलेली अतिरिक्त चरबीमुळे बॉडीचा शेप बिघडण्यास सुरूवात होते. यासोबतच अनेक प्रकारच्या आजारांना ही आमंत्रण दिलं जातं. वाढलेल्या वजनामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. रोजच्या व्यायामासोबतच वजन कमी करण्यासाठी हेल्दी फूड्स (healthy foods) निवडण्याचाही सल्ला दिला जातो. वजन कमी करण्यासाठी अनेक जण ग्रीन टीचा (green tea) पर्याय निवडतात. मात्र बऱ्याच कमी लोकांना माहित असेल की ग्रीन टी ऐवजी ग्रीन कॉफी (green coffee) ही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर (beneficial for weight loss) आहे.
हिरव्या रंगाची कॉफी एका खास प्रकारच्या भाजीपासून तयार करण्यात येते. चला तर मग जाणून घेऊया ग्रीन कॉफीबद्दल.
अधिक वाचा- नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक, स्थानिकांनी फोडल्या वाहनांच्या काचा
वजन कमी करण्यासाठी प्या ब्रोकोली कॉफी म्हणजेच ग्रीन कॉफी
वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली कॉफीचे सेवन करावे. हे शरीरासाठी खूप आरोग्यदायी मानले जाते. जर तुम्हाला पुरेशा भाज्या खाणे शक्य नसेल तर ब्रोकोली कॉफी पिणं हा एक उत्तम पर्याय आहे. ब्रोकोली कॉफी शरीरातील वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. तसेच, ब्रोकोलीमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानलं जातं. ब्रोकोली कॉफीमध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स असतात, जे तुम्हाला चरबी कमी करण्यास मदत करू शकतात.
कशी तयार कराल ब्रोकोली कॉफी
ब्रोकोली कॉफी तयार करण्यासाठी प्रथम ब्रोकोलीचे लहान तुकडे करा आणि उन्हात वाळवा.
त्यानंतर ते चांगले बारीक करून एका बॉक्समध्ये ठेवा. याशिवाय तुम्ही बाजारातून ब्रोकोली पावडरही खरेदी करू शकता.
कॉफी तयार करण्यासाठी गॅसवर 1 कप दूध गरम करा.
त्यात ब्रोकोली पावडर घालून चांगले उकळा.
ही कॉफी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.