महिलांनो ! घरच्या घरी 'हे' तीन उपाय करुन वाढवा डोक्यावरील केस, लांबसडक केसांनी वाढवा तुमचं सौंदर्यं

प्रत्येक महिलेची (Women) इच्छा असते की, तिचे केस (Hair) लांब, काळे, घनदाट आणि रेशमी असावेत. किंबहुना केस ही प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातील एक महत्त्वाची बाब असते. मात्र प्रदूषण, आहार आणि चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींमुळे केसांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

grow hair on your head by doing 'this'  three remedy at home,
महिलांनो! घरच्या घरी 'हे' तीन उपाय करुन वाढवा डोक्यावरील केस (संग्रहित छायाचित्र)  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • प्रदूषण, आहार आणि चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींमुळे केसांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
  • केसांमधील कोंडा ही समस्यां अनेकांना सतावत असते.
  • कांद्याचा रस आणि खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावण्याचा फायदा होतो.

 नवी दिल्ली :  प्रत्येक महिलेची (Women) इच्छा असते की, तिचे केस (Hair) लांब, काळे, घनदाट आणि रेशमी असावेत. किंबहुना केस ही प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातील एक महत्त्वाची बाब असते. मात्र प्रदूषण, आहार आणि चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींमुळे केसांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. अनेकजण केसांच्या तक्रारींनी त्रस्त असल्याचं पाहायला मिळतात. केस गळती, केसामधील कोंडा या समस्यां अनेकांना सतावत असतात.  हल्ली अनेकांना टक्कल किंवा केस गळतीचा त्रास अनेकांना उद्भवत आहे.  तर अनेकांना लांबसडक केस हवे असतात.

कांद्याचा रस आणि अन्य पोषक तत्व या समस्येवर जालीम उपाय ठरू शकतो. पण कोणत्याही वस्तूच्या वापराबाबत योग्य माहिती आवश्यक आहे. दक्षिण चीनमधील हुआंगलुओ गावातील आपल्या महिलांच्या लांबलचक केसांसाठी प्रसिद्ध आहे. या गावातील महिलांचे केस 5 ते 7 फूट लांब आणि 1 किलोपर्यत वजनी असतात. अशीच केस करायची असतील तर तुम्ही केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

कांद्याचा रस लांबसडक केसांसाठी कसा उपयुक्त ठरू शकतो, त्याबाबतच्या काही टिप्स -   

1) कांद्याचा रस आणि खोबरेल तेल  

कांद्याचा रस आणि खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावण्याचा फायदा होतो. कांद्याच्या रसाप्रमाणेच खोबरेल तेलाच्या वापराने केस लवकर वाढू शकतात. कोमट खोबरेल तेलात कांद्याचा रस मिसळून तो केसांच्या मुळांना लावल्यास, केसांना चमक येईल.

2) कांद्याचा रस आणि जैतून (ऑलिव) तेल

कांद्याचा रस आणि जैतून (ऑलिव) तेल कांद्याच्या रसात जैतून तेल मिसळून ते केसांच्या मुळाला लावल्यास त्याची चांगली वाढ होते. हे मिश्रण योग्यप्रकारे मिसळून ते केसांना लावल्यास काही दिवसातच फरक जाणवू शकतो. 

3) कांद्याचा रस आणि बियर

 कांद्याचा रस आणि बियरच्या मिश्रणाचेही भन्नाट फायदे आहेत. सर्वप्रथम कांद्याच्या रसाने डोक्यावरील त्वचेला हलका मसाज करा. त्यानंतर चांगल्या बियर शॅम्पूने केस धुवा. कांद्याचा रस आणि बियर मिसळून ते डोक्याला लावू शकता. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी