Side effects of Viagra | नागपूरमध्ये गर्लफ्रेंडसोबत सेक्स करत असताना एका तरुणाचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. व्हाएग्राच्या अतिसेवनामुळे त्याला हार्ट अटॅक आल्याचं समजल्यावर या विषयाची जोरदार चर्चा देशभर सुरू झाली.
इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच लैगिक कमजोरी ही खरं तर उतारवयात सुरू होणारी समस्या आहे. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून व्हाएग्रा हे औषध घेण्यात येतं. मात्र सध्या बाजारातील या औषधाच्या खपाची स्थिती पाहिली, तर उतारवयातील नागरिकांपेक्षाही तरुणांकडून या गोळ्यांच्या सेवनाचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येतं. याबाबत नुकताच अमेरिेकेत एक सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार जवळपास 40 टक्के तरुणांमध्ये शीघ्रपतनाची समस्या असल्याचं दिसून आलं. व्हाएग्रा बनवणाऱ्या फायझर कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या गोळ्यांसाठी सर्वाधिक मागणी ही चाळीशीच्या आतबाहेर असणाऱ्या तरुणांकडून नोंदवली जाते.
शीघ्रपतन सायकोेजेनिक आणि इतर ताणतणांमुळे निर्माण होणारी समस्या आहे. सततचा तणाव, नातेसंबंधात येणारा कडवटपणा यासारख्या मानसिक कारणांमुळे शीघ्रपतनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे काही शारीरिक कारणंही यामागे असल्याचं दिसून येतं. मुख्यत्वे हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह या कारणांमुळेही ही समस्या सतावू लागते. लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा असतानादेखील लिंगाला आवश्यक ताठरपणा न येण्याची मुख्य समस्या यात भेडसावते. यामुळे पुरुष आणि स्त्री या दोघांनाही लैंगिक संभोगाचा आनंद मिळत नाही.
लैंगिक संबंध प्रस्थापित करताना येणाऱ्या या समस्येमुळे खजिल व्हायला होत असल्याचा अनुभव अनेक तरुण व्यक्त करतात. त्यामुळे आपल्या सेक्स पार्टनरसमोर आपला परफॉर्मन्स बिघडू नये किंवा आपल्यात काही कमतरता आहे, असं जाणवू नये, यासाठी व्हाएग्राचा सर्रास वापर करण्याकडे तरुणांचा कल वाढत असल्याचं चित्र आहे.
अधिक वाचा - Foods That Lower Bad Cholesterol: बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खा हे हेल्दी फूड, हृदय नेहमी राहील निरोगी
1998 साली व्हाएग्रा बाजारात आलं आणि त्यानंतर ते कंपनीचं बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट बनलं आहे. जगभरातील सर्वात यशस्वी औषध असं त्याचं वर्णन केलं जातं. मात्र अगदी विशीतल्या तरुणांनी व्हाएग्रा घेणं योग्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. सध्या तरुणांमध्ये ताणतणावाचं आणि चुकीच्या जीवनशैलीचं प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम लैंगिक क्षमतेवर होताना दिसतो. त्यामुळे या समस्येवरील शॉर्टकट उपाय म्हणून व्हाएग्रा वापरण्याकडे तरुणांचा कल असल्याचं डॉक्टर सांगतात. मात्र यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
अधिक वाचा - Uric Acid : रक्तातील युरिक ॲसिड कमी करण्यासाठी दोन अस्त्रं, कांदा आणि अक्रोडचा असा करा उपयोग
ज्यांना हृदयाशी संबंधित आजार किंवा विकार आहेत, त्यांच्यासाठी व्हाएग्रा धोकादायक असल्याचं डॉक्टर सांगतात. एकदा सेक्स केल्यानंतर पुन्हा सेक्ससाठी तयार व्हायला जेवढा नैसर्गिक कालावधी गरजेचा असतो, तो कालावधी व्हाएग्रामुळे कमी होतो. याचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. या औषधामुळे रक्तवाहिन्या विस्तारल्या जातात आणि त्यामुळे ब्लड प्रेशर अचानक ड्रॉप होण्याची शक्यता असते.
थोडक्यात, व्हाएग्रा घेण्यापूर्वी किंंवा त्याबाबत काहीही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.