पोटाच्या विकारांपासून हृदयविकारावर लाभदायी आहे गवार, जाणून घ्या गवार खाण्याचे फायदे

Guar is beneficial for heart disease stomach problems, know the benefits of eating guar in marathi : गवार खाण्याचे आरोग्याला अनेक प्रकारचे लाभ आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आज जाणून घ्या गवार खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे...

Guar is beneficial for heart disease stomach problems, know the benefits of eating guar in marathi
पोटाच्या विकारांपासून हृदयविकारावर लाभदायी आहे गवार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • पोटाच्या विकारांपासून हृदयविकारावर लाभदायी आहे गवार
 • जाणून घ्या गवार खाण्याचे फायदे
 • गवार खाण्याचे आठ प्रमुख फायदे

Guar is beneficial for heart disease stomach problems, know the benefits of eating guar in marathi : गवारची भाजी चविष्ट असते. ही भाजी खाण्याच्या निमित्ताने गवार पोटात जाते. पण गवार खाण्याचे आरोग्याला अनेक प्रकारचे लाभ आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आज जाणून घ्या गवार खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे...

गवारची शेती प्रामुख्याने उष्णकटिबंध क्षेत्रात होते. भारतात मध्य प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणावर गवारची शेती होते. गवारचे शास्त्रीय नाव साया मोटिसस टेट्रागोनोलोबस असे आहे. इंग्रजी भाषेत गवारला क्लस्टर बीन (cluster bean) किंवा गवार (Guar) या दोन नावांनी ओळखले जाते. गवारची भाजी केली जाते. गवारची भाजी खाण्याचे आरोग्याला अनेक लाभ होतात.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

 1. कोलेस्टेरॉल : गवारच्या भाजीत शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता आहे. 
 2. मधुमेह : गवारची भाजी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे मधुमेह अर्थात डायबिटिस असलेल्यांनी गवारची भाजी खावी असा सल्ला दिला जातो. गवारचा  ग्लाइसेमिक इंडेक्स अतिशय कमी आहे. गवारमधील टॅनिन आणि फ्लेवोनोइड्स रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात.
 3. हाडे : गवार नियमित मर्यादीत प्रमाणात खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले फॉस्फरस आणि कॅल्शियम गवार खाण्याने शरीराला मिळते. 
 4. पोटाचे विकार : पोटाशी संबंधित अनेक विकारांना बरे करण्यासाठी गवार खाण्याचा सल्ला दिला जातो. गवारमधील फायबर पोटाचे विकार दूर करण्यास मदत करते. 
 5. हृदयविकार : गवारमधील फायबर, पोटॅशिअम, फॉलेट हृदयविकाराशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास लाभदायी आहे.
 6. तणाव आणि चिंता : गवारमधील हायपोग्लायसेमिक तणाव कमी करण्यास मदत करते. गवार खाल्ल्याने मानसिक शांतता राखण्यास मदत होते.
 7. लठ्ठपणा : गवारमध्ये कमी कॅलरी असतात. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना अनेकदा गवार खाण्याचा सल्ला दिला जातो. 
 8. रक्ताभिसरण : गवारमधील लोह शरीरातील रक्तातल्या हिमोग्लोबिनच पातळी वाढविण्यास मदत करते. तसेच गवारमधील फायटोकेमिकल्स शरीरातले रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी