Home Remedies : पेरूच्या पानांमध्ये आहे युरीक एसिड नियंत्रण करण्याची क्षमता, हा घरगुती उपाय नक्की करून पहा 

तब्येत पाणी
Updated Mar 19, 2023 | 09:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Home Remedies For uric acid : पेरूचे आरोग्यासाठी अगणित फायदे आहेत. मात्र,  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याची पाने देखील आरोग्याचा खजिना आहे.  पेरूच्या पानामुळे वारंवार त्रास देणारी युरीक एसिड समस्या नियंत्रणात आणता येते. ह्या पानाचे सेवन कसे करावे हे जाणून घेऊयात. 

पेरूचे आरोग्यासाठी अगणित फायदे आहेत
पेरूच्या पानांमुळे युरिक अॅसिड कमी होऊ शकते   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पेरूच्या पानांमुळे युरिक अॅसिड कमी होऊ शकते
  • शरीरातील युरीक अॅसिड वाढवणाऱ्या हायपरयुरिसेमियाची पातळी कमी करते.
  • पेरूच्या पानातील एंटीऑक्सिडंट्स शरीरात प्युरीन मेटाबॉलिजमला गती देतात

Home Remedies For uric acid  युरिक अॅसिड  आणि संधिवात ही एक वारंवार होणारी समस्या आहे.  ह्या समस्या पूर्णपणे नाहीशी करता येत नाही, कारण याच्यावर पूर्णपणे इलाज उपलब्ध नाहीत. असे असले तरी, या समस्येवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.  त्यामुळे आपण या लेखात वारंवार त्रास देणाऱ्या संधिवात आणि युरीक अॅसिड समस्यांवर आराम मिळवून देणाऱ्या घरगुती टिप्स जाणून घेणार आहोत. ज्या तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त ठरू शकतात.  उदाहरणार्थ, पेरूची पाने.  पेरूच्या पानांचे सेवन केल्याने केवळ यूरिक अॅसिड नियंत्रित ठेवता येत नाही, तर संधिरोगाचा त्रास कमी करण्यासही त्याची मदत होते. चला जाणून घेऊयात.

हे पण वाचा : Megablock News : मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

पेरूच्या पानांमुळे युरिक अॅसिड कमी होऊ शकते का?
पेरूच्या पानांचे सेवन युरिक ऍसिड कमी करण्यास मदत करते. पेरूची पाने शरीरातील युरीक अॅसिड वाढवणाऱ्या हायपरयुरिसेमियाची पातळी कमी करते. ज्यामुळे, युरीक एसिड शरीरात जमा न होता, शरीरातून बाहेर काढण्यास मदत होते. यासोबतच पेरूच्या पानातील एंटीऑक्सिडंट्स शरीरात प्युरीन मेटाबॉलिजमला गती देतात. या कारणामुळे शरीरात यूरिक अॅसिडची समस्या नियंत्रणात राहते. 

हे पण वाचा : ही औषधी वनस्पती करते मधुमेहापासून झटक्यात सुटका

यूरिक एसिड साठी पेरूच्या पानाचे सेवन कसे करावे ? 
यूरिक एसिड साठी पेरूच्या पानाचे तुम्ही दोन प्रकारे सेवन करू शकतात. सर्वप्रथम तर पेरूची पाने पाण्यात उकळून त्याचे पानी पिता येऊ शकते. तर दुसरे या पानाचा काढा करून त्याचे सेवन करता येईल.  या दोन पद्धती यूरिक एसिड समस्यासाठी फायदेशीर आहेत.  

हे पण वाचा : Yellow Teeth : दातांचा पिवळेपणा दूर करणारे सोपे प्रभावी घरगुती उपाय

  • (हा लेख तुमच्या सामान्य माहितीसाठी देण्यात आला आहे, कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी