Gym After Surgery : हार्ट सर्जरीनंतर जिमला जाणं धोकादायक! चुकूनही घालू नका जीव धोक्यात

ज्यांना हृदयाशी संबंधित काही आजार असतात, त्यांनी जिम जॉईन न कऱण्याचा सल्ला दिला जातो. त्याऐवजी चालण्याचा व्यायाम सर्वोत्तम मानला जातो.

Gym After Surgery
हार्ट सर्जरीनंतर जिमला जाणं धोकादायक  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • हार्ट सर्जरी झाल्यावर जिमला जाणं धोकादायक
  • हार्ट अटॅक येण्याची असते शक्यता
  • जिम जॉईन करण्यापूर्वी करा तपासणी

Gym After Surgery : व्यायाम कऱणं (Exercise) हे नेहमीच फायद्याचं मानलं जातं. गेल्या काही वर्षात भारतात लठ्ठपणा, अतिरिक्त वजन आणि इतर लाईफस्टाईल आजारांचं प्रमाण वाढत चालल्याचं चित्र आहे. चुकीचा आहार आणि सदोष लाईफस्टाईलमुळे हे आजार कमी वयातच जडताना दिसतात. फिट राहण्यासाठी अनेकजण नियमित जिमला जाऊन व्यायाम (Gym Exercise) करण्याचा प्रयत्न करतात. काहीजण वेट ट्रेनिगं करतात तर काहीजण कार्डिओ व्यायाम करत असतात. मात्र असा व्यायाम करणं हे काहीजणांसाठी घातक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. आता व्यायाम करणं एखाद्यासाठी घातक कसं ठरेल, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल. मात्र ज्या नागरिकांना हार्टशी संबंधित काही विकार (Heart related issues) आहेत किंवा ज्यांची हार्ट सर्जरी झाली आहे, अशा नागरिकांनी जिमपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामागे काही कारणं आहेत. 

अचानक ताण घेण्याची क्षमता होते कमी

जिममध्ये व्यायाम करताना वजनं उचलल्यामुळे अचानक शरीरावर ताण येतो. ज्यांच्या हृदयाची क्षमता कमी झाली असेल, त्यांना असा ताण सहन करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या हृदयावर प्रमाणापेक्षा अधिक ताण येऊन ते बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकांना जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याची उदाहरणं आपण पाहतो. आपल्या हृदयाचं आरोग्य ठिक नसल्याची कल्पनाही अनेकांना नसते. त्यामुळेही अटॅक येण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Waking up in the night : रोज रात्री ठराविक वेळीच जाग येते? या गोष्टी तपासून पाहा

हळूहळू करा सुरुवात

जर तुमच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली असेल, तर तुम्हाला व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र हा व्यायाम म्हणजे जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग करणे किंवा कार्डिओ एक्सरसाईज कऱणे नव्हे. सुरुवातीला चालण्यापासून व्यायामाला सुरुवात करण्याचा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जातो. हळूहळू चालायला सुरुवात करून जर 40 मिनिटांत 4 किलोमीटर तुम्ही चालू शकत असाल, तर तुमच्या हृदयाचं आरोग्य हळूहळू सुधारत असल्याचं समजलं जातं. ही क्षमता गाठल्यानंतरही पुढील काही महिने हाच व्यायाम सुरू ठेवावा आणि हृदयाची क्षमता वाढवत राहावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. 

अधिक वाचा - Heart Attack Factors: या 4 गोष्टी आहेत हृदयाच्या शत्रू, न टाळल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

टाळा या चुका

तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार असेल, तर जिममध्ये जाणं टाळलं पाहिजे. मात्र जरी असा कुठलाही त्रास नसेल तरीही जिममध्ये जाण्यापूर्वी आपल्या हृदयाची क्षमता तपासणं गरजेचं आहे. तुम्हाला धाप लागणे, छातीत दुखणे अशा काही गंभीर समस्या असतील, तर जिममध्ये व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी तिथल्या इन्स्ट्रक्टर्सना त्याची पूर्ण कल्पना देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जिममध्ये जाण्यापूर्वी कुठल्याही कार्डिओलॉजिस्टला भेटून आपल्या हृदयाच्या क्षमतेची तपासणी करून घेणंही आवश्यक आहे. ही काळजी घेतल्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका तुम्ही टाळू शकाल आणि आनंदी आयुष्य जगू शकाल. 

डिस्क्लेमर - हार्ट आणि व्यायामाची संबंधित या सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. तुमच्या मनातील शंकांचं तज्ज्ञांना भेटून निरससन करणं आणि त्यांच्या सल्ल्याने निर्णय घेणं आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी