H3N2 Cases:बदलत्या हवामानामुळे अनेकजण सर्दी, ताप, खोकल्याच्या (Cough) समस्यांनी त्रस्त झाले आहेत. जर तुमच्यातही ही तीन लक्षणं असतील आणि ती बऱ्याच काळापासून असतील तर सावध व्हा. वातावरणात नवीन विषाणू पसरत असून यामुळे अनेकांना ताप, खोकल्याची लागण झाली आहे. ताप आणि खोकल्याचा उद्रेक हा इन्फ्लूएंझा A चा H3N2 व्हायरसमुळे झाला असल्याचं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नं म्हटलं आहे. (H3N2 Symptoms 2023: H3N2 virus Rapidly spread in changing environment; ICMR issued Guidelines)
अधिक वाचा : हिरवा कांदा त्वचा चमकवेल आणि केसांना देईल नवी चमक
ICMRने दिलेल्या माहितीनुसार, H3N2इतर व्हायरसपेक्षा जास्त प्रभावी आहे. या व्हायरसने त्रस्त असलेले लोक मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होऊ लागले आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या H3N2 रुग्णांपैकी 92 टक्के रुग्णांना ताप, 86 टक्के रुग्णांना खोकला, 27 टक्के श्वासोच्छवास आणि 16 टक्के अस्वस्थ वाटतं.
अधिक वाचा : जास्त तूप खाणाऱ्यांनो सावधान, नाहीतर होईल नुकसान
याशिवाय, संस्थेच्या निरीक्षणात असे आढळून आले की, अशा रुग्णांपैकी 16 टक्के रुग्णांना न्यूमोनिया आणि 6 टक्के रुग्णांना अस्वस्थ वाटून श्वास घेण्यास त्रासही होतो. तसेच, ICMR नं सांगितलं आहे की, H3N2 व्हायरसनं ग्रस्त असलेल्या गंभीर रुग्णांपैकी सुमारे 10 टक्के रूग्णांना ऑक्सिजनची गरज आहे आणि 7 टक्के रूग्णांना काळजीसाठी ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
अधिक वाचा : रात्री झोपण्याआधी पाणी प्यायल्याने वारंवार वापरावे लागेल टॉयलेट
ICMR मधील एपिडेमियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. निवेदिता यांच्या मते, 15 डिसेंबर 2022 पासून, 30 VRDLSच्या डेटानुसार, इन्फ्लूएंझा A एच3एन2 व्हायरसच्या (H3N2 Virus)रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पण सुदैवाची गोष्ट म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून तापमान वाढू लागल्यानं विषाणूचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मते, व्हायरसनं त्रस्त असलेल्या रुग्णांनी अॅन्टीबायोटिक्सचा अतिवापर टाळावा आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असल्याचं डॉ. निवेदिता म्हणाल्या.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, संपूर्ण जगात दरवर्षी या हंगामी इन्फ्लूएंझा विषाणूची 30-50 लाख प्रकरणे नोंदवली जातात. त्यापैकी 2.9 ते 6.5 लाख लोकांचा मृत्यू श्वसनाच्या आजारांमुळे होतो.