Nose Picking: अनेकांना नाकात बोटं घालण्याची सवय (Habit of nose picking) असते. काहीजण एकांतात नाकात बोटं घालतात, तर काहींना आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत, याचंदेखील भान नसतं. चारचौघांत, सर्वांदेखत ते नाकात बोटं घालून नाक कोरत बसल्याचं चित्र दिसतं. अशी माणसं इतरांना अवघडून टाकतात आणि आजूबाजूच्या लोकांना हा प्रकार किळसवाणा वाटण्याची शक्यता असते. मात्र नाकात बोटं घालणं हे केवळ असभ्यपणाचे लक्षण नाही, तर ते गंभीर आजारांना दिलेलं निमंत्रणदेखील ठरण्याची शक्यता असते. यामुळे डिमेंशिया (Dementia) आणि अल्झायमर (Alzheimer) यासारखे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. जाणून घेऊया, नाकात बोट घालण्याच्या सवयीचे कुठले गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात, याविषयी.
ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ विद्यापीठातील संशोधकांनी उंदारांवर केलेल्या नव्या संशोधनात क्लेमाइडिया न्यूमोनिए हा घटक नाकावाटे थेट मेंदूत प्रवेश करत असल्याचं दिसून आलं आहे. हे एक प्रकारचे विषाणू असतात. अभ्यासातील निष्कर्षानुसार हे विषाणू नाकावाटे मेंदूत पोहोचतात आणि मेंदूवर दुष्परिणाम करतात. त्यामुळे अल्झायमरची लक्षणे दिसायला सुरुवात होते.
अधिक वाचा - Dark Neck Removal: मानेवर जमा झाला आहे काळा थर...मग हे सोपे घरगुती उपाय दूर करतील काळेपणा
या संशोधनात सहभागी असणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मतानुसार, उंदरांवर दिसलेले हे परिणाम माणसावरही दिसण्याची दाट शक्यता आहे. उंदीर आणि माणूस यांच्या नाक आणि मेेंदूची रचना एकसारखीच आहे. त्यांची कार्यप्रणालीदेखील एकसारखीच असते. त्यामुळे उंदारांच्या बाबतीत जी लक्षणे दिसली, तीच लक्षणे माणसाच्या बाबतीतही दिसू शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार, नाकात बोटं घालणं किंवा नाकातील केस तोडणं ही शरीरासाठी हानीकारक बाब ठरण्याची शक्यता असते. जर नाकात बोट घातल्यामुळे आतील भागाला जखम झाली किंवा त्याचं नुकसान झालं, तर मेंदूचं संरक्षण कमी होतं. नाकात असणारे केस आणि इतर घटक यांची नैसर्गिक रचना ही मेंदूच्या संरक्षणासाठी झालेली असते. विषाणू आणि इतर धुलीकण थेट मेंदूत किंवा श्वसनसंस्थेत जाऊ नयेत, यासाठी केस आणि इतर घटक काम करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांत अनेकजण आपल्या नाकातील केस वॅक्स करून काढून टाकत असल्याचं दिसून आलं आहे. त्याचाही परिणाम मेंदूवर होण्याची शक्यता असते.
अधिक वाचा - How to prevent acid reflux: जेवल्यानंतर येतात पित्ताचे ढेकर? ‘या’ अंगावर झोपून पाहा
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकात बोटं घातल्यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे नाकातील चिकट पदार्थ प्रमाणापेक्षा कमी झाल्यामुळे धुलीकण आणि व्हायरल थेट मेंदूत प्रवेश करण्याची शक्यता निर्माण होते. वास येण्याचे प्रमाण कमी होणे, हे या आजाराचे प्राथमिक लक्षण मानले जाते. त्यासाठी नाकाची योग्य प्रकारे साफसफाई करणे, नाकात बोटे न घालणे, अंघोळ करताना स्वच्छ हातांनी आणि हळूवारपणे नाकाची सफाई करणे आवश्यक आहे.