Hair Care: तरूणाईतच केस होतायत पांढरे? मेहंदी आणि रंगाशिवाय या सोप्या पद्धतीने करा काळे 

तब्येत पाणी
Updated Jun 16, 2022 | 15:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

White Hair । वयाचा एक विशिष्ठ आकडा ओलांडल्यानंतर केस पांढरे होणे ही समस्या सामान्य आहे. पण आजकाल त्याचा वयाशी काहीही संबंध नाही. आता लहान मुलांपासून ते २५ वर्षांपर्यंतच्या तरूण मुलांचे केस पांढरे होत आहेत.

Hair can be blackened with this simple method without mehndi and color
मेहंदी आणि रंगाशिवाय सोप्या नैसर्गिक पद्धतीने केस करा काळे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वयाचा एक विशिष्ठ आकडा ओलांडल्यानंतर केस पांढरे होणे ही समस्या सामान्य आहे.
  • पांढरे केस काळे करण्यासाठी चहाची पावडर खूप प्रभावी आहेत.
  • कढीपत्ता केसांच्या मुळांची मजबुती वाढवते आणि ते त्यांना काळेही करतो.

White Hair । मुंबई : वयाचा एक विशिष्ठ आकडा ओलांडल्यानंतर केस पांढरे होणे ही समस्या सामान्य आहे. पण आजकाल त्याचा वयाशी काहीही संबंध नाही. आता लहान मुलांपासून ते २५ वर्षांपर्यंतच्या तरूण मुलांचे केस पांढरे होत आहेत. लहान वयात केस पांढरे होण्यामागे अनुवांशिक कारणे असली तरी ही एक गंभीर समस्या आहे. आहार आणि अव्यवस्थित जीवनशैलीमुळे हे होत असल्याचे दिसून येते. (Hair can be blackened with this simple method without mehndi and color). 

अधिक वाचा : Maharashtra SSC Result : या दिवशी लागणार दहावीचा निकाल

या सोप्या पद्धतीने केस करा काळे 

  1. चहापावडर - पांढरे केस काळे करण्यासाठी चहाची पावडर खूप प्रभावी आहेत. यासाठी दोन चमचे चहापावडर आणि एक कप पाणी घेऊन ते चांगले उकळून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर कापूस किंवा ब्रशच्या मदतीने केसांना लावा आणि कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
  2. आवळा आणि मेथी - आवळा पावडरमध्ये मेथीचे दाणे भिजवून रात्रभर राहू द्या आणि घट्ट पेस्ट बनवा. आता ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावून रात्रभर ठेवा आणि सकाळी हलक्या शॅम्पूने केस धुवा. यामुळे केस काळे, दाट आणि मजबूत होतील.
  3. कांद्याचा रस - कांद्याच्या रसामध्ये काही प्रभावी गुण असतात जे केस काळे ठेवण्यास मदत करते. यासाठी कांद्याच्या रसात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळून ते चांगले मिसळा आणि टाळूची मालिश करा. साधारण अर्ध्या तासानंतर हलक्या शॅम्पूने धुवा.
  4. कढीपत्ता - कढीपत्ता केसांच्या मुळांची मजबुती वाढवते आणि ते त्यांना काळेही करतो. त्यासाठी खोबरेल तेलात कढीपत्ता टाका आणि ते तडतडेपणा येईपर्यंत गरम करा. त्यानंतर ते गाळून केसांची मसाज करा. साधारण तासाभरानंतर शॅम्पूने स्वच्छ धुवा. 
  5. बटाट्याची साल - बटाट्याची साल पाण्यात उकळा आणि घट्ट द्रावण तयार झाल्यावर ते थंड करून गाळून घ्या. आता केस आधी शॅम्पूने धुवा आणि कंडिशनरऐवजी या मिश्रणाचा वापर करा आणि नंतर धुवा. ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे.

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी