Hair Care Tip: पांढरे केस नॅचरली काळे करण्यासाठी आहारात करा 'या' 10 खास पदार्थांचा समावेश

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Aug 31, 2022 | 15:03 IST

Foods To Eat For Naturally Black Hair: केस गळणं किंवा केस पांढरे होणं अशा समस्या डोकं वर काढतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यावरचे उपाय सांगणार आहोत. वेळेआधी केस पांढरे होणे ही मुख्य समस्या आहे.

Hair care tips
पांढऱ्या केसांची समस्या करा दूर, आहारात घ्या 'हे' 10 पदार्थ 
थोडं पण कामाचं
  • केस गळणं किंवा केस पांढरे होणं अशा समस्या डोकं वर काढतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यावरचे उपाय सांगणार आहोत.
  • वेळेआधी केस पांढरे होणे ही मुख्य समस्या आहे. ही समस्या उद्भवण्याचं प्रमुख कारण म्हणजे अयोग्य आहार किंवा पोषक आहार न घेणे.
  • आज आम्ही या बातमीत तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी आणि निरोगी केसांसाठी 10 पदार्थ सांगणार आहोत.

मुंबई: Foods To Eat For Naturally Black Hair: दररोज अनियमित आहारामुळे (Daily irregular diet)  आणि धकाधकीच्या जीवनशैलीचा (stressful lifestyle) परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तसंच अशा जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावरही होत असतो. योग्य आहार हे शरीरासाठी चांगलं असतं. मात्र तिच गोष्ट चांगली नसल्यास त्याचे वाईट परिणाम होण्यास सुरूवात होते. अशावेळी केसावर लवकर परिणाम होत असतो. केस गळणं किंवा केस पांढरे होणं अशा समस्या डोकं वर काढतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यावरचे उपाय सांगणार आहोत. वेळेआधी केस पांढरे होणे ही मुख्य समस्या आहे. ही समस्या उद्भवण्याचं प्रमुख कारण म्हणजे अयोग्य आहार किंवा पोषक आहार न घेणे. ( Hair care tip Eat these 10 foods to darken white hair naturally)

शारीरिक आरोग्याचा प्रश्न असो किंवा त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याचा विषय असो, आहारात संतुलित आहार आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. पण बरेचदा लोक गोंधळलेले असतात की पांढरे केस काळे होणे आणि केस गळणे,  केस कोरडे होणे आणि केस अकाली पांढरे होणे या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काय खावे? किंवा आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत? आज आम्ही या बातमीत तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी आणि निरोगी केसांसाठी 10 पदार्थ सांगणार आहोत. 

अधिक वाचा- यंदा बाप्पाला दाखवा चूरमा लाडूचा प्रसाद, सोपी रेसिपी

पांढरे केस काळे करण्यासाठी हे 10 पदार्थ जरूर खा

व्हिटामिन असलेले अन्न

केसांना निरोगी ठेवणारे आवश्यक व्हिटामिन असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा, जसे की  व्हिटामिन B आणि B12, B7 किंवा बायोटिन, D, E, A इ. केसांना निरोगी ठेवण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावते.

मिनरल्स असलेले पदार्थ 

जस्त, आयरन, मॅग्नेशियम, सेलेनियम, तांबे इत्यादी आवश्यक मिनरल्स केस निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या पदार्थांमध्ये असणे आवश्यक आहे. आवश्यक व्हिटामिन आणि मिनरल्स हे फळे, हिरव्या पालेभाज्यांमध्ये चांगल्या प्रमाणात असतात.

आल्याचं करा सेवन 

आले अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. त्यामुळे आल्याचा चहा, आल्याचे पाणी नियमितपणे घ्या. एक चमचा आले बारीक करून घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा आणि प्या. 

ब्लॅकस्ट्रॅप गुळाचे सेवन करा

आठवड्यातून किमान 3 दिवस एक चमचा ब्लॅकस्ट्रॅप गुळाचे सेवन करा. हे केसांसाठी आवश्यक व्हिटामिन आणि मिनरल्स जसे की व्हिटामिन बी 6, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयरने समृद्ध आहे.

आवळा खा
आवळ्याचे सेवन केल्याने केसांच्या जवळपास सर्व समस्या दूर होतात. हे शरीरातील पित्त दोष देखील संतुलित करते. 

काळे तीळ

पांढऱ्या तिळापेक्षा काळे तीळ केसांसाठी जास्त फायदेशीर मानले जातात. हे केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते. आठवड्यातून 2-3 वेळा एक चमचा काळे तीळ गूळ किंवा मध मिसळून खाल्ल्यानं फायदा होईल. 

गव्हाच्या गवताचा रस

पांढऱ्या केसांपासून मुक्त होण्यासाठी दररोज एक ग्लास ताज्या गव्हाच्या गवताचा रस प्यावा. तुम्ही तुमच्या शेक आणि स्मूदीजमध्ये एक चमचा व्हीटग्रास पावडर टाकून देखील ते सेवन करू शकता.

अधिक वाचा- डार्क सर्कलनं हैराण झालात?, मग वापरा 'हे' तेल

गाजर किंवा गाजराचा ज्यूस

केस निरोगी ठेवण्यासाठी दररोज गाजर किंवा गाजराचा एक ग्लास रस सेवन करणे आवश्यक आहे.

कॅटालेस एंझाइम असलेले पदार्थ खा

हे एंझाइम ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यास मदत करते आणि केसांना निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हे लसूण, कोबी, रताळे, केळ, ब्रोकोली, बदाम इत्यादींमध्ये मुबलक प्रमाणात असते.

अश्वगंधा

अश्वगंधाचे सेवन केल्याने केस निरोगी राहण्यास मदत होतेच, शिवाय अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. तुम्ही दुधासोबत अश्वगंधा पावडर, सप्लिमेंट्स इत्यादींचे सेवन करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी