Hair Care Tips : रेशमी, मुलायम केसांसाठी वापरा हे घरगुती उपाय, केस होतील सिल्की

Hair Care Tips : अनेकवेळा विविध कारणांमुळे केस कोरडे, निर्जीव होतात, केस कमकुवत (Weak Hair) होतात. सुंदर, मुलायम आणि मजबूत केस फक्त आपले सौंदर्यच वाढवत नाहीत तर ते त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात वाढ देखील होते.

Hair Care Tips
केसांच्या आरोग्यसाठीच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • चांगल्या, सुंदर आणि निरोगी केसांमुळे (Silky Hair)कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व खुलते
  • घरगुती किंवा नैसर्गिक स्वरुपाचे उपाय करू शकतात जेणेकरून तुमचे केस मजबूत आणि मुलायम
  • नैसर्गिक उपाय केसांसाठी अत्यंत उपयुक्त

Hair Care | नवी दिल्ली : केस हा मानवी व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा घटक आहे. चांगल्या, सुंदर आणि निरोगी केसांमुळे (Silky Hair)कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व खुलून येते. सर्वानाच वाटते की आपले केस हे मुलायम, रेशमी आणि सुंदर असावेत. मात्र अनेकवेळा विविध कारणांमुळे केस कोरडे, निर्जीव होतात, केस कमकुवत (Weak Hair) होतात. सुंदर, मुलायम आणि मजबूत केस फक्त आपले सौंदर्यच वाढवत नाहीत तर ते त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात वाढ देखील होते. अशावेळी तुम्ही घरगुती किंवा नैसर्गिक स्वरुपाचे उपाय  (Hair Care) करू शकतात जेणेकरून तुमचे केस मजबूत आणि मुलायम होतील. (Hair Care Tips :Natural remedies for Silky & Strong hair)

नैसर्गिक उपाय (Natural remedies)नेहमी आपली त्वचा आणि केसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यांचे साइड इफेक्टदेखील नसतात आणि घरच्या घरी सहजरित्या ते करण्यासारखे देखील असतात. मुलायम, सिल्की आणि मजबूत केसांसाठी कोणकोणते घरगुती आणि नैसर्गिक उपाय लाभदायक ठरू शकतात ते पाहूया.

सुंदर, सिल्की केसांसाठीचे उपाय -

१. गरम तेलाने मालिश

एका वाटीत १-२ मोठे चमचे बदाम तेल आणि खोबऱ्याचे तेल घ्यावे. ते एकत्र करावे आणि हे तेलाचे मिश्रण थोडे कोमट करावे. या तेलाच्या मिश्रणाने आपल्या केसांना आणि केसांच्या मुळाशी, त्वचेला मालिश करावी. आपल्या केसांना एका थोड्याशा ओलसर, गरम टॉवेलने झाकावे आणि ३०-४५ मिनिटांपर्यत असेच राहू द्यावे. त्यानंतर एखाद्या माइल्ड शॅम्पूने केस धुवून घ्यावेत.

२. शिया बटरचा वापर करा

एका वाटीत १-२ टेबल स्पून शिया बटर घ्यावे. डबल बॉयलरच्या मदतीने याला विरघळून घ्यावे. नंतर थोडे थंड होऊ द्यावे. अर्थात खूप वेळ थांबू नये अन्यथा ते परत घट्ट होईल. त्यानंतर वितळलेले शिया बटर केसांच्या मुळाशी आणि संपूर्ण केसांना लावावे. काही मिनिटांसाठी आपल्या बोटांच्या अग्रांनी केसांच्या मुळाशी थोडी मालिश करावी. याला असेच ३० ते ४५ मिनिटे राहू द्यावे. यानंतर माइल्ड शॅम्पूने धुवून टाकावे. निर्जीव, कमकुवत केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हा याचा आठवड्यातून एकदा वापर करू शकता.

३. मध आणि दही यांचा हेअर पॅक

अर्धा कप साधे आणि ताजे दही घ्यावे आणि त्यामध्ये २ चमचे मध मिळसावे. हे मिश्रण केसांना हेअर पॅक किंवा मास्कच्या रुपाने लावावे. केसांना मुळापासून टोकापर्यत सर्वत्र लावावे. आपल्या बोटांनी केसांच्या मुळाशी, त्वचेवर हलक्या हाताने व्यवस्थित मालिश करावी आणि हा मास्क ३०-४० मिनिटापर्यत राहू द्यावा. यानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवावे. याचा वापर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करावा.

४. केळ्याचा हेअर मास्क

एक पिकलेले केळे घ्यावे, त्याचे साल काढून टाकावे. त्यानंतर केळ्याला मॅश करावे. पूर्णपणे ठेचलेल्या केळ्याला संपूर्ण केसांमध्ये लावावे, मुळापासून टोकापर्यत सर्वत्र लावावे. ३०-४० मिनिटांपर्यत हा मास्क राहू द्यावा. त्यानंतर याला माइल्ड शॅम्पूने धुवून काढावे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा मास्क लावावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी