Hair Fall issue : तुमचे केस खूप जास्त प्रमाणात गळत आहेत? या जीवनसत्वाचा असू शकतो अभाव 

तब्येत पाणी
Updated Mar 26, 2023 | 14:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hair Fall issue tips in Marathi: : सध्याच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी खाण्या पिण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्व आणि पोषकतत्व घटकांनी परिपूर्ण असलेल्या पदार्थांचे सेवन न केल्यामुळे खूप जास्त प्रमाणात केस गळू लागतात. वाढत्या आणि गंभीर स्वरूपाच्या या केसगळती समस्यांबद्दल आपण जाणून घेऊ. 

तज्ञांच्या मते शरीरातील डी जीवनसत्वाच्या अभावामुळे न्यूरो संबंधित समस्या उद्भवू शकते. तसेच रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन संबंधित व्यक्ति वारंवार आजारी पडू शकते. 
केसगळतीचे सर्वात मोठे कारण असते ते विटामीन डी चा अभाव.   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • डी जीवनसत्वाच्या अभावामुळे केस गळतीची समस्या उभी राहते
  • डी जीवनसत्वाच्या अभावामुळे थकवा, स्नायू कमजोर होणे, चक्कर येणे तसेच वारंवार आजारी पडण्याची लक्षणे दिसून येतात
  • दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून ही चांगला फरक दिसून येईल.  

Hair Fall issue tips in Marathi:: केस गळणे ही एक साधारण गोष्ट आहे, आपल्या प्रत्येकांच्या आयुष्याचा हा एक भाग आहे. मात्र, केस जास्त प्रमाणात गळू लागले कि तो चिंतेचा विषय बनू लागतो. 

एनसीबीआय मध्ये प्रकाशित एक रिपोर्ट नुसार केसांचे गळणे सामान्य बाब आहे. 50 टक्के पुरुष आणि 50 वर्षांपर्यंत महिलांना केसगळतीला सामोरे जावे लागते. hair fall issue lack of this vitamin can lead to hair fall

अधिक वाचा : ​सुकन्या योजनेच्या गुंतवणूकदारांना ३१ मार्चला बसू शकतो धक्का

संशोधकांच्या मते जीवनसत्वाच्या अभावामुळे केस गळतीची समस्या उभी राहते. मात्र, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस पोषकतत्व युक्त अशा अन्नपदार्थांचे सेवन करु शकत नाही, आणि केसगळतीच्या समस्येला आमंत्रित करतो. जाणून घेऊ असे कोणते पदार्थ आहेत, कि जे केसगळती समस्यांचे वेळीच निवारण करू शकतात. 

आम्ही इथे तुम्हाला काही महत्वपूर्ण जीवनसत्वांची माहिती सांगणार आहोत, जे केस गळती होऊ देत नाही. 

विटामीन डी चा अभाव

केसगळतीचे सर्वात मोठे कारण असते ते विटामीन डी चा अभाव. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केवळ केस कमकुवत करत नाही तर शरीरातले हाडांवर देखील त्याचा प्रभाव पडू शकतो.  त्यामुळे डॉक्टरांना शरीरातील डी जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी इंजेक्शन द्यावे लागते. डी  जीवनसत्वाच्या अभावामुळे थकवा, स्नायू कमजोर होणे, चक्कर येणे तसेच वारंवार आजारी पडण्याची लक्षणे दिसून येतात. तसेच डी विटामीनच्या अभावामुळे तणावाची पातळीदेखील वाढते आणि केसं मोठ्याप्रमाणात गळू लागतात.

अधिक वाचा : ​Pooja Sawant : मराठी अभिनेत्री पूजा सावंत झाली क्वारंटाइन

तज्ञांच्या मते शरीरातील डी जीवनसत्वाच्या अभावामुळे न्यूरो संबंधित समस्या उद्भवू शकते. तसेच रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन संबंधित व्यक्ति वारंवार आजारी पडू शकते. 

शरीरात डी जीवनसत्वाची कमी का होते?

पुरेसे प्रमाणात उन्ह न मिळाल्याने तसेच खाण्या-पिण्याच्या बेकार सवयीमुळे शरीरातील डी जीवनसत्व कमी होते. त्यासाठी आपल्या डॉक्टरांकडे दरसहा महिन्याने रुटीन चेकअप नक्की करून घ्या. तज्ञांच्या मते शरीरात विटामीन डी ची पातळी घसरल्यास इंजेक्शनच्या माध्यमातून ती भरून काढता येते. तसेच दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून ही चांगला फरक दिसून येईल.              

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी