मुंबई: जुन्या काळात टक्कलपणा(baldness) हे म्हातारपणाचे लक्षण मानले जात असे. मात्र हल्ली २५ ते ३० वर्षांचे तरूणही हेअरफॉलची(hairfall) शिकार ठरतात. अनेक लोकांचे तर लग्नाआधीच सर्व केस जातात आणि मग ते आपला आत्मविश्वास गमावू लागतात. काही बाबतीत हे जेनेटिक(genetic) असते मात्र बऱ्याच केसेसमध्ये हे अनहेल्दी(unhealthy) आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे हे होते.Hair Fall: Never eath this 5 food which affect on hair fall
अधिक वाचा - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या अडचणीत वाढ
तरूणांच्या आजकाल वाढत्या फास्टफूड खाण्याने त्यांच्यामध्ये केसगळतीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांनी असे फास्टफूड खाणे बंद केले नाही तर त्यांचे वेळेआधी केस गळू शकतात.
डायबिटीजच्या रुग्णांना अनेकदा साखर कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की साखरेच्या सेवनानेही केस लवकर गळतात. अशातच गोड पदार्थ तितक्याच प्रमाणात खा जितके एनर्जीसाठी गरजेचे आहेत.
बाजारात मिळणारे जंक आणि फास्ट फूड भले आपल्याला आवडत नाही मात्र यामुळे पूर्ण आरोग्य बिघडते. यातील सॅच्युरेटेड फॅट्स केवळ वजन वाढवत नाही तर यामुळे केसांनाही नुकसान होते. यात आढळणारे DHT नावाचे अँड्रोजन टक्कलपणा वाढण्यास मदत करतात तसे ऑईली स्काल्पचेही नुकसान करतात. यामुळे केसांचे रोमछिद्र बंद होऊ लागतात यामुळे केसांची वाढ होण्यास त्रास होतो.
आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे की मासे खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम मिळते. मात्र जर तुम्ही बाजारातील दूषित मासे खरेदी करून खाल्ले तर त्यातील मर्क्युरी शरीरास नुकसानदायक ठरते. हे तुमच्या केसगळतीचे कारण ठरू शकते. यामुळे मासे खरेदी करतान सावधानता बाळगा.
तरूण वर्गामध्ये दारू पिण्याचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. याचा परिणाम केसांवर स्पष्टपणे दिसतो. आपले केस केरोटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात. जर दारूचे सेवन केले तर प्रोटीन सिंथेसिसव वाईट परिणाम होतो. यामुळे केस केवळ कमजोरच होत नाहीतर यांची चमकही कमी होते.
अधिक वाचा - मालेगावहून मुंबईत आले 3 ट्रक,पोलिसांकडून मोठा प्लान उद्धवस्त
अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरास प्रोटीन आणि नॅचरल फॅट मिळते आणि यामुळे केसांच्या वाढीसाठी अंडे लावले जाते. मात्र ते चुकूनही कच्चे खाऊ नका. केरोटिनच्या उत्पादनामध्ये कमतरता होऊ शकते. याचा सरळ परिणाम आपल्या केसांवर पडू शकतो.