गळणाऱ्या केसांसाठी रामबाण उपाय आहे मेथीचे पाणी, असा बनवा हेअर पॅक

तब्येत पाणी
Updated May 25, 2019 | 13:31 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

केसांचे गळणे, केस पांढरे होणे आणि तसेच केसांची चमक निघून जाणे या समस्या नेहमीच्या बनल्या आहेत. या सर्वामवर एक उपाय आहे. हा उपाय म्हणजे मेथी दाणे. मेथी या सर्व समस्यांना संपवून टाकेल.

fenugreek seeds
मेथीचे दाणे  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: जर तुमचे केस गळून एकदम कमी झाले आहेत आणि तुम्ही सततचे उपाय करून थकला असाल त्यानतंरही काही फायदा होत नाही आहे तर मेथी तुमच्यासाठी परफेक्ट सॉल्युशन आहे. हा उपाय नैसर्गिक आणि कोणत्याही प्रकारची हानी करणारा नाही. वाढते प्रदूषण, खारे पाणी, योग्य खाण्यापिण्याचा अभाव तसेच इतर शारिरीक आजारांमुळे केसांचे गळणे ही नेहमीची समस्या बनली आहे. मात्र यावर अनेकदा महागडे उपचार करूनही काही फायदा होत नाही. 

आम्ही आज तुम्हाला असा नैसर्गिक उपाय सांगत आहोत ज्यामुळे तुमची ही समस्या मुळापासून नष्ट होऊ शकते. हा उपाय इतका परिणामकारक आहे की योग्य तऱ्हेने वापर केल्यास समस्या नक्कीच दूर होऊ शकते. मेथी केवळ केस गळतीवरच प्रभावी नाही तर केस सफेद होणे, चमक कमी होणे, केसांना फाटे फुटणे यावरही रामबाण उपाय आहे. जाणून घ्या कसा वापर कराल मेथीच्या पाण्याचा...

गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय आहे मेथी

  1. मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी दह्यासह मिसळून याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा. एका तास केसांना हे मिश्रण लावून ठेवा. त्यानंतर शाम्पूने केस धुवा. हा पॅक तुमच्या गळत्या केसांना रोखण्यासोबतच कोंडा तसेच रफनेसची समस्या दूर करेल. 
  2. १० ग्रॅम मेथी बारीक वाटून घ्या आणि त्यात नारळाचे तेल मिसळून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. एका तासानंतर साध्या पाण्याने केस धुवा. हा उपाय तुमच्या गळत्या केसांसाठी रामबाण उपाय म्हणून सिद्ध होऊ शकतो. 
  3. मेथी दाणे पाण्यात टाकून ते पाणी उकळा. आता हे पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. या पाण्यात तुम्ही कांद्याचा रसही टाकू शकता. हे पाणी केसांच्या मुळाशी स्प्रे करा. हे मिश्रण एक तास केसांना लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. 
  4. मेथीचे दाणे तुम्ही सुक्या आवळ्यांसोबत वाटून घ्या. आता ही पावडर नारळाच्या तेलात वा तिळाच्या तेलात थोडा वेळ उकळून घ्या. हे तेल गाळून घ्या. हे तेल गळत्या केसांवर तसेच अवेळी केस पांढरे झाल्यास त्यावर गुणकारी आहे. 

नोट: प्रस्तुत लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स अथवा उपाय ही केवळ साधी माहिती आहे. कोणतेही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा तसेच हेअर स्पेशालिस्टचा सल्ला जरूर घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...