या सोप्या उपायाने करा केसगळतीवर मात

तब्येत पाणी
Updated Apr 02, 2019 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

केस गळतीवर महागडी औषधं आणि पार्लरचा खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपाय केल्यानं तुमची गेस गळती थांबू शकते.

hair problem
केसांच्या समस्या  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई- आजकाल धूळ, प्रदूषण आणि बदललेली लाइफ स्टाइल यामुळे स्त्री असो वा पुरूष दोघांनाही केस गळतीचा सामना करावा लागतोय. अवेळी केस गळतीमुळे टक्कल पडणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. अशातच पार्लर आणि वेगवेगळी औषधांचा खर्चही वाढलाय. मात्र आम्ही आपल्याला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

उन्हाळा आणि कांदा

उन्हाळा आहे कांदा खाल्ल्याने उन्हाचा दाह कमी तर होतोच. मात्र त्याचा उपयोग आपण केसगळतीवर सुद्धा करू शकतो. एका कांद्याचा रस काढून घ्यावा. हा रस टाळूवर लावून १५ मिनीटांनी शॅम्पूने केस धुवून घ्यावेत. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय केल्यास लवकरच याचा फायदा दिसेल.

लसूण

लसणाच्या काही पाकळ्या घ्याव्यात त्या ठेचून त्यात खोबरेल तेल मिसळून घ्यावं. हे मिश्रण गरम करावं, थोडं कोमट झाल्यावर त्याने केसांच्या मुळाशी मसाज करावी. मसाज करून एक तासानंतर केस धुवून घ्यावेत.

खोबरेल तेल आणि नारळाचं दूध

आठवड्यातून एकदा तरी नारळाच्या दुधानं मसाज करावी. नारळाचं दूध काढून केसांना लावायचं आणि सुती मऊ कपड्याने केस बांधून ठेवायचे. तासाभरानंतर केस शॅम्पूने धुवून टाकावेत. तसंच कमीतकमी आठवड्यातून एकदा तरी खोबरेल तेल केसांना लावावं. रात्री तेल लावून दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून घ्यावेत.

मोहरीचं तेल आणि मेहेंदीची पानं

साधारण ६० ते ७० ग्राम मेहेंदीच्या पानात २५० ते ३०० ग्राम मोहरीचं तेल मिक्स करावं. हे मिश्रण मेहेंदीची पानं चॉकलेटी होईपर्यंत मंद आचेवर गरम करून घ्यावं. मिश्रण गरम झाल्यावर गॅस बंद करावा आणि हे मिश्रण मऊ कपड्यातून गाळून घ्यावं. गाळलेलं तेल हवाबंद डब्यात भरून ठेवावं. आठवड्यातून एकदा या तेलानं केसांच्या मुळाशी मालिश करावी. या तेलाच्या वापरानं केस गळणे कमी होईल. पांढऱ्या केसांवर सुद्धा हे तेल उपयोगी आहे. तेलानं मसाज केल्यावर एक तासभर ठेवून मग केस धुवून घ्यावेत. केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा उपयोग करू नये. अगदी कोमट पाण्याने केस धुवावेत.

अस्वच्छतेमुळेही केस गळती वाढते. केस आठवड्यातून एकदाच नाही तर दोन-तीनदा धुवावेत. त्यामुळे केस स्वच्छ राहतात आणि केसगळतीही कमी होते. अस्वच्छ केस अधिक गळतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...