Hair fall: केस जास्तच गळतायत? मग दररोजच्या या सवयींमध्ये तात्काळ करा बदल

how to stop hair fall immediately: केस गळतीची अनेक कारणे असू शकतात. वेळोवेळी अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. तुम्ही या समस्येवर मात करु शकता. जाणून घ्या कसे...

hair fall stop natural home remedies read health tips in marathi
Hair fall: केस जास्तच गळतायत? मग दररोजच्या या सवयींमध्ये तात्काळ करा बदल  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • केस गळतीमुळे तुम्ही झालात त्रस्त?
  • काळजी करू नका, घरगुती उपायांनी तुम्ही केस गळती रोखू शकता

Tips to stop hair fall hair loss read in marathi: सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यापैकीच एक म्हणजे केस गळती. केस गळती सामान्य गोष्ट असली तरी त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे केस गळतीकडे दुर्लक्ष करु नका.

केस गळतीची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये अनुवंशिकता, असंतुलित हार्मोन्स, ताण-तणाव, खराब पोषण आहार आणि केसांवर अधिक प्रमाणात केमिकल्सचा वापर या गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही झोपताना गादीवर किंवा उशीवर केस गळल्याचं दिसू लागले तर समजून जा की ही समस्या गंभीर आहे. पण घाबरण्याचं कारण नाहीये कारण तुम्ही काही ठराविक गोष्टींचे पालन केल्यास केस गळती रोखू शकता.

हे पण वाचा : दररोजच्या या सवयींमुळे गळतात केस

हायड्रेटेड

केसांच्या आरोग्यात सुधारणासाठी तुम्हाला आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. पाणी हे टाळू आणि केसांना हायड्रेट करते त्यामुळे केस गळणे कमी होते आणि केस मजबूत होतात. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्रास पाणी प्यावे.

टाळूची मालिश

तुमच्या टाळूची मसाज केल्याने नवी केसांच्या वाढीला प्रोत्साहन मिळते. यामुळे केस गळती रोखण्यास मदत होते. दररोज काही मिनिटे आपल्या बोटांच्या सहाय्याने टाळूला हळू-हळू मसाज करा. यामुळे रक्तप्रवाहात वाढ होते आणि केसांच्या वाढीला प्रोत्साहन मिळते.

हे पण वाचा : जेवताना पाणी प्यावे की नाही? तुम्ही काय करता?

निरोगी आहार

केसांना आवश्यक पोषक तत्त्वे पुरवण्यासाठी निरोगी आणि संतुलित आहार आवश्यक असतो. त्यासाठी तुम्ही लोह, जिंक, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी-12 युक्त असलेले पदार्थ खा. केसांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी अंडी, मासे, पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

धूम्रपान टाळा

धूम्रपान हे केस गळती होण्यामागचं एक मुख्य कारण आहे. धूम्रपान केल्याने टाळूला रक्तपुरवठा कमी होतो आणि केसांचे नुकसान होऊ शकते. यामुळे केस गळू लागतात.

हे पण वाचा : बाळाला या भांड्यात जेवण भरवल्यास मिळतील असंख्य फायदे

केसांवर केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर

केसांवर केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केल्याने सुद्धा केस गळू लागतात. जास्त केमिकलयुक्त हेअर कलर, स्ट्रेटनर आणि इतर स्टायलिंग प्रोडक्ट्सचा वापर शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. केसांची काळजी घेणारे नैसर्गिक उत्पादने वापरल्यास केस सौम्य होतील आणि केसांची वाढही चांगली होईल.

तणाव

ताण-तणावामुळे सुद्धा केस गळतीची समस्या उद्भवू शकते. इतकेच नाही तर तणावामुळे केस पांढरे सुद्धा होऊ शकतात. तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी ध्यान, दीर्घ श्वासोच्छवास यासारख्या तंत्रांचा अवलंब केला पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी