केस पांढरे झाले असतील तर समजून घ्या की व्हिटामिनची कमतरता, मग आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

खूप कमी वयातच लोकं पांढऱ्या केसांच्या समस्येला लोकं बळी पडतात. शरीरावर केस हा असा भाग आहे की आपलं संपूर्ण सौंदर्य त्यावर टिकून राहतं.

White Hair
Diet for white hair  |  फोटो सौजन्य: TOI Archives
थोडं पण कामाचं
  • काहीजण पांढऱ्या केसांशी तडजोड करतात. मात्र या समस्येतून सहज सुटका होऊ शकते.
  • पांढऱ्या केसांची समस्या निर्माण होण्यामागे मुख्य कारण म्हणजे व्हिटामिनची कमतरता.
  • तुम्ही योग्य आहार घेऊन यापासून स्वतःची सुटका करु शकता

नवी दिल्ली: सध्याची आरोग्यशैली पाहता केस पांढरे होणं सामान्य झालं आहे. खूप कमी वयातच लोकं पांढऱ्या केसांच्या समस्येला लोकं बळी पडतात. शरीरावर केस हा असा भाग आहे की आपलं संपूर्ण सौंदर्य त्यावर टिकून राहतं. पण त्यावला जेव्हा पांढऱ्या केसांचं ग्रहण लागतं तेव्हा मन चलबिचल होतं. काही लोकं याला अनुवांशिक असल्याचं मानतात. तर काहीजण पांढऱ्या केसांशी तडजोड करतात. मात्र या समस्येतून सहज सुटका होऊ शकते. यासाठी फक्त तुम्हाला तुमचा आहार सुधारण्याची गरज आहे. (Diet In White Hair) 

पांढऱ्या केसांची समस्या निर्माण होण्यामागे मुख्य कारण म्हणजे व्हिटामिनची कमतरता. तुम्ही योग्य आहार घेऊन यापासून स्वतःची सुटका करु शकता. चला जाणून घेऊया की कोणत्या सुपर फूड्सचा तुमच्या आहारात समावेश केल्यानं केसांची ही समस्या दूर होते.

या गोष्टींचा आहारात करा समावेश 

आयरनचा प्रामुख्यानं करा समावेश 

आयरनच्या कमतरतेमुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत डाळिंब, मेथी, मोहरी, राजगिरा, धणे, पुदिना आणि बीटरूट आहारात आवश्यक समावेश करावे. या पदार्थात भरपूर आयरन आढळते.

प्रोटीनही खूप महत्त्वाचं 

तुम्हाला तुमचे केस जर का नेहमी काळे आणि चमकदार हवे असल्यास तुमच्या शरीराला भरपूर प्रोटीनयुक्त पोषण द्या. यामुळे तुमचे केस कधीही पांढरे होणार नाहीत. प्रोटीनयुक्त आहारात तुम्ही मांस, अंडी, मासे, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाज्या, सुका मेवा याचा समावेश करा. हे तुमच्या केसांसाठी लागणारी प्रोटीनची कमतरता भरुन काढेल. 

या पदार्थांचंही कसा सेवन 

केस गळणे, तुटणे आणि केस पांढरे होणे देखील बी 12 व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होत असते. त्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही दूध, दही, चीज, सोयाबीन, ब्रोकोली आणि मशरूम खाण्यास सुरुवात करावी. हे देखील चांगले स्त्रोत आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी