Hair Loss : मुंबई : कुठल्याही व्यक्तीसाठी केस गळणे ही फार मोठी समस्या आहे. बर्याच वेळेला आपल्य हलगर्जीपणा आणि चुकीच्या सवयींमुळे केस गळण्याची समस्या वाढते. यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया केस गळण्याची समस्या कशी दूर करता येईल यासाठी खास टिप्स.
केसांच्या आरोग्यासाठी शॅम्पू महत्त्वाचा आहे. परंतु शॅम्पूच्या अतिवापरामुळे केसांचे नुकसान होते. सातत्याने शॅम्पूचा वापर केल्यास केस बारीक होतात आणि गळायला लागतात. यासाठी शॅम्पूचा वापर कमी प्रमाणात करणे गरजेचे आहे.
बर्याच वेळेला आपण केसांची योग्य निगा राखत नाही. आठवड्यातून एकदा शॅम्पू आणि हेअर कंडीशनरने स्वच्छ करावेत. केसांसाठी चांगल्या दर्जाची फणी वापरावी. केस फार खेचू नये त्यामुळे केस लवकर गळतात.
केस वाढतील आणि त्यांचे आरोग्य चांगले राहील यासाठी आपण केसांसंबंधित आहार घेत नाही. केसांसाठी प्रोटीन, सुका मेवा, फळं आणि हिरव्या पालेभाज्या फायदेशीर ठरतात. केसांना प्रोटीन फार महत्त्वाचे असतात. केसांना योग्य प्रमाणात प्रोटीन मिळाल्यास केस मजबूत होतात.
सिगरेट किंवा बिडीमुळे फक्त फुफ्फुसांनाच नव्हे तर केसांनाही धोका पोहोचतो. केस गळतीमागे धुम्रपानाचीही सवय कारणीभूत असते. सिगरेट प्यायल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतो. त्यामुळे ऑप्क्सिडेटिव्ह ताण वाढतो आणि केसांची नैसर्गिक वाढ थांबते. त्यामुळे वेळीच ही सवय बदला.
केसांच्या स्टाईलिंगसाठी आपणे जे प्रोडक्ट्स वापरतो त्यामुळेही केस गळण्याची समस्या जाणवते. अशा प्रोडक्ट्सचा सातत्याने वापर केल्यास केस जास्तच गळतात. जे लोक आपल्या केसांवर जास्त वॅक्स लावतात, जे लोक जास्त ब्लीच लावतात त्यांनाही केस गळण्याची समस्या जाणवते.