जीवनशैलीमध्ये बदल करून गळते केस थांबवा

तब्येत पाणी
Updated Apr 24, 2019 | 19:27 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

गेल्या काही वर्षांमध्ये पुरूषांमध्ये वेळेआधीच केस गळण्याच्या समस्येत वाढ होऊ लागली आहे. दहा पैकी ८ पुरुषांना केस गळण्याची समस्या सतावते. 

hair problem
केसांच्या समस्या 

मुंबई: गेल्या काही वर्षात भारतीय पुरूषांमध्ये वेळेआधीच केस गळण्याची समस्या वाढू लागली आहे. दर १० पैकी ८ पुरूष केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माहितीनुसार, २० ते ३० वर्षाहून अधिक वयाचे तरूण अशा वेळेस केस उगवण्याची सर्जरी करण्याला पसंती देतात. एखाद्या व्यक्तीचे दिवसाला ५० ते १०० केस गळतात तर ही सामान्य गोष्ट आहे. मात्र त्यापेक्षा अधिक केस गळत असतील तर ते योग्य नव्हे. वेळेआधी केस गळण्याची समस्या मानसिक तणाव, धूम्रपान, दारूचे सेवन, प्रदूषण आणि अपुरे पोषण यामुळे होते. 

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तसेच तणावाच्या स्थितीमुळे तरूणांना ही समस्या जाणवत आहे. केस गळण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे मानसिक तसेच शारिरीक तणाव होय. तणावाने ग्रस्त असलेले तरूण, नोकरीच्या ठिकाणी तणावग्रस्त स्थिती, जंक फूड खाणे यामुळे केस गळण्याची समस्या सतावते. जेवणामध्ये पोषकतत्वे तसेच फायबरचा अभाव. योग्य प्रमाणात पाणी न पिणे, धूम्रपान करणे तसेच अल्कोहोलचे अधिक सेवन यामुळेही केस गळण्याची समस्या वयाआधीच सुरू होते.

आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून आपण ८० टक्क्यांपर्यंत ही समस्या कमी करू शकतो. जीवनशैलीमध्ये साधारण बदल म्हणजेच सात तासांची झोप, योग्य प्रमाणात पाणी पिणे तसेच प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करणे 

वेळेआधीच केस गळणे रोखायचे असेल तर वापरा या टिप्स

  1. डोक्याला कोमट तेलाने मसाज करा. यामुळे रक्तसंचार वाढतो. तसेच केसांची रोमछिद्रे खुली होतात.
  2. योग तसेच ध्यान करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. तणावपूर्ण परिस्थीतीपासून दूर राहा. तणाव हार्मोन जसे की एपिनेफ्रीन आणि कोर्टसोल केसांच्या नैसर्गिक विकासाकरता अडथळे ठरतात. 
  3. ताजी फळे, भाज्या खा. लोह, जस्त, प्रोटीन आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असलेले भोजनाचे सेवन करा.
  4. धूम्रपान करू नका. तसेच अल्कोहोलचे सेवन करू नका. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...