Curd Hair Pack: कोरड्या केसांसाठी असं काम करतं दही 

दही केवळ खाण्यासाठीच नाही तर केसांसाठीही खूप चांगलं असतं. केस गळत असल्यास किंवा निर्जीव झाले असतील तर दही केसांची प्रत्येक समस्या दूर करू करतं. येथे जाणून घ्या दह्याचा हेअर पॅक बनवण्याची कृती. 

Curd Hair Pack
Curd Hair Pack: कोरड्या केसांसाठी असं काम करतं दही   |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

 • केसांची काळजी घेण्यासाठी दह्याचा वापर खूप आधीपासून केला जातो.
 • . केसांमधील कोंडा आणि खाज येणं यावर दही काम करतं.
 • ह्यात फॅटी अॅसिड असतं. जे केस हेल्दी ठेवण्यासोबतच कोरडे आणि निर्जीव मऊ करतात.

केसांची काळजी घेण्यासाठी दह्याचा वापर खूप आधीपासून केला जात आला आहे. यात अॅंन्टी बॅक्टिरिअल गुणांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात व्हिटामिन देखील असतात जे केसांच्या सर्व समस्या दूर करण्याचं काम करते. केसांमधील कोंडा आणि खाज येणं यावर देखील काम करतं.  दह्यात फॅटी अॅसिड असतं. जे केस हेल्दी ठेवण्यासोबतच कोरडे आणि निर्जीव मऊ करतात. जर का तुम्हाला तुमचे केस कोमल, शाइनी आणि मजबूत हवे असल्यास आठवड्यात दोन वेळ दह्याचा पावर पॅक लावायला विसरू नका. येथे जाणून घ्या याची सोपी पद्धत. 

कोंडा दूर करण्यासाठी पॅक 

साहित्य 

 • 1 कप दही 
 • 5 टी स्पून मेथी दाण्याची पावडर 
 • 1 चमचा लिंबाचा रस 

कसा बनवालः एक भांडं घ्या आणि त्यात सगळं साहित्य एकत्र करून व्यवस्थित मिसळून घ्या. ब्रशाच्या मदतीनं हे मिश्रण केसांना लावावे. केसांना पॅक लावून झाल्यानंतर केसांना शॉवर कॅप लावा आणि जवळपास 40 मिनिटं तसंच ठेवा. आपल्या केसांना माइल्ड हर्बल शॅम्पूंनी धुवा. प्रभावी परिणाम मिळविण्यासाठी एका महिन्याभरात एका आठवड्यात दोन वेळा लावा आणि फरक बघा. 

केसांची शाईन वाढवणारा पॅक 

केसांमधून धुळ, माती हटवण्यासाठी हा पॅक खूप फायदेशीर आहे. 

साहित्यः

 • 1 कप दही
 • 20 जास्वंदाचं फूल 
 • 10 कडुलिंबाची पाने
 • अर्ध्या संत्राचा रस 

कृतीः जास्वंदाचं फूल आणि कडुलिंबाची पानं मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्यात दही आणि संत्राचा रस मिसळा. आता पॅक आपल्या केसांना लावा आणि अर्धा तास आपल्या केसांवर तसाच राहू द्या. त्यानंतर केस शॅम्पूनं धुवून टाका. 

केस मजबूत करण्यासाठीचा पॅक 

साहित्यः 

 • 1 कप दही
 • 1 अंडं
 • 2 चमचे ऑलिव्ह ऑईल
 • 3 चमचे अॅलोवोरा जेल
 • 2 चमचा तुळसीच्या पानाची पेस्ट 
 • 2 चमचे कडीपत्ताच्या पानाची पेस्ट 

कसा बनवाल पॅकः एक भांडं घ्या आणि सर्व साहित्य एकत्र मिसळा. आपल्या केसांच्या मुळापासून डोक्यापर्यंत हेअर पॅक लावा. हा पॅक एक तास लावून ठेवा. पॅक लावला असताना केस शॉवर कॅपनं झाका. त्यानंतर आपल्या नियमित शॅम्पूनी धुवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...