हँडसम अभिनेता गश्मिर महाजनीने उलघडले फिटनेस सिक्रेट, इच्छा नसताना असे बनवले सिक्स पॅक्स्

Gashmeer Mahajani On His Fitness: मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी याने नुकतीच आपल्या फिटनेसविषयी अनेक गुपिते प्रेक्षकांसमोर उघडली आहेत. कामासोबतच तो फिटनेस कसा राखतो हे त्याने सांगितले.

Handsome actor Gashmir Mahajani reveals fitness secrets, made six packs against his will
हँडसम अभिनेता गश्मिर महाजनीने उलघडले फिटनेस सिक्रेट, इच्छा नसताना असे बनवले सिक्स पॅक्स्   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गशमीर महाजनी लांब केस आणि वाढलेली दाढी यामध्ये लूक व्हायरल झाला आहे.
  • गशमीर महाजनी यांचा हा लूक त्यांच्या 'सरसेनापती हंबीरराव' या नव्या चित्रपटातील आहे.
  • हा चित्रपट अनसंग वॉरियर हंसाजी मोहिते यांच्या जीवनावर आधारित आहे,

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम अभिनेता गश्मीर महाजनी शेवटचा इमली या हिंदी टीव्ही मालिकेत दिसला होता. या टीव्ही सीरियलमध्ये आदित्यची भूमिका साकारणाऱ्या गश्मीर महाजनीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. अलीकडेच, गश्मीरने आदित्यच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि त्याच्या फिटनेसबद्दल अनेक रहस्ये प्रेक्षकांसोबत शेअर केली आहेत. (Handsome actor Gashmir Mahajani reveals fitness secrets, made six packs against his will)

अधिक वाचा : 

Tips to lower Cholesterol: तुम्हाला खावे लागणार नाही औषध, ताटात असू द्या या 6 गोष्टी, आपोआप घटवा कोलेस्ट्रॉल!

त्याच्या फिटनेसबद्दल बोलताना गश्मीर म्हणाला की, 'मला माझ्या वेब शोसाठी सिक्स पॅक फिजिक बनवावे लागले. तेव्हापासून माझी फिटनेस पथ्ये अतिशय कडक आहेत. सिक्स पॅक असणे मला आवडत नव्हते पण वेब शोमधील माझ्या पात्रासाठी ते आवश्यक होते.

अधिक वाचा : 

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने खावे अंजीर, होईल जबरदस्त फायदा

यासोबतच त्याने वर्कआउट करताना येणाऱ्या समस्याही शेअर केल्या. गश्मीरने सांगितले की, सकाळी ५ वाजता उठून वर्कआउट करणे खूप कठीण होते. जेव्हाही शिफ्ट उशिरा सुरू व्हायची तेव्हा मी थोडा विश्रांती घ्यायचो आणि माझ्या सेटवर २ तास वर्कआउट करायचो. मला वाटते की एक अभिनेता म्हणून चांगले दिसणे आणि तंदुरुस्त राहणे खूप महत्वाचे आहे. त्याने सांगितले की, काहीही खाण्यापूर्वी तो काय खातोय ते पाहतो. तो सर्व काही खात असे पण थोडे थोडे खात असे. तो मिठाईही खात असे.

अधिक वाचा : 

Health Tips: गृहिणींनी १५ मिनिटांसाठी घरीच करा हे ५ व्यायाम; काही दिवसातच कमी होईल वजन

ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचा गश्मिर मुलगा आहे. त्याने 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळबंद', 'कान्हा', 'वन वे तिकिट', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या मराठी आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. तसेच त्याने 'मुस्कुराके देख जरा' व 'डोंगरी का राजा' या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी