कोरोनाच्या विषाणूने (Corona virus) संपूर्ण जगात खळबळ माजवली आहे आणि यामुळे अनेकांचा जीवही गेला (lives lost) आहे. याच्या लक्षणांबद्दल (symptoms) बोलायचे झाले तर यात खूप ताप (high fever), कोरडा खोकला (dry cough), थकवा (fatigue) आणि अंगदुखी (body pain) यांचा समावेश आहे. मात्र याव्यतिरिक्तही अशी अनेक लक्षणे (other symptoms) आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष्य (neglect) केले गेले आहे आणि हे अधिक धोकादायक (dangerous) असू शकते.
त्वचेवर आलेल्या अॅलर्जीकडे लोक अनेकदा दुर्लक्ष्य करतात. मात्र ही कोरोनाची लक्षणे असू शकतात. त्वचेशी संबंधित समस्या असलेल्या 6पैकी फक्त 1 रुग्णाला वैद्यकीय उपचारांची गरज असते तर दुसरीकडे अनेक रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक दिवसांनी या समस्या जाणवू शकतात, त्यामुळे ही लक्षणे गांभीर्याने न घेणे हे महागात पडू शकते. लहान मुलांच्या त्वचेबाबतची कोणतीही समस्या ही गंभीर संक्रमणाचे प्रमुख लक्षण असू शकते. जाणून घ्या कोरोनाचा विषाणू त्वचेपर्यंत पसरल्यास काय लक्षणे दिसू शकतात.
कोरोना विषाणूंची शिकार झालेल्या लोकांमध्ये हा विषाणू नसा आणि धमन्यांपर्यंत पोहोचू शकतो ज्यामुळे त्वचेवर सूज येऊ शकते जी त्वचेवर खाज, लाल चट्टे, खुणा अशा स्वरूपात दिसू शकतात. तर आपल्या मुलांमध्ये डागाळलेली आणि कोरडी त्वचा ही पाय, हात, पोट आणि पाठीवर दिसू शकते. या दोन्ही लक्षणांवर लक्ष देण्याची गरज आहे. शरीरात रक्तदाब वेगाने बदलण्यास आणि प्राणवायूची पातळी बदलल्यासही शरीरावर अशी लक्षणे दिसू शकतात.
कोव्हिड टोज हे सर्वप्रथम लहान मुलांमध्ये दिसू आले, मात्र नंतर वयस्कर व्यक्तींमध्येही ही समस्या सामान्य झाली आहे. कोरोना झालेल्या लोकांमध्ये ही समस्या दिसून आली आहे जे पहिल्यांदा चिलब्लेन वाटले होते. यात पायांवर सूज आणि खाज यासह डागही दिसू शकतात. यावर लक्ष द्यायला हवे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये सुकलेल्या ओठांचाही त्रास दिसून येतो. ओठ खूप सुकल्याने तोंडाच्या आतही याचा त्रास होऊ शकतो. कोरोनाच्या संसर्गानंतर या लोकांमध्ये ही समस्या सामान्य झाली आहे. भरपूर पाणी न प्यायल्याने आणि पौष्टिक आहार न घेतल्यानेही ही समस्या होऊ शकते. याशिवाय ओठ निळे पडणे हेही एक लक्षण आहे ज्याकडे दुर्लक्ष्य करू नये.
अनेक अभ्यासांमधून असे समोर येत आहे की ज्या लोकांना आधीपासूनच आरोग्यविषयक समस्या आहेत त्यांना हा धोका जास्त आहे. श्वसनविकार, हृदयविकार, जाडेपणा किंवा वयस्कर लोकांनाही कोरोनापासून सावध राहण्याची गरज आहे.