वजन कमी करण्यासाठी न्याहारीत करा या पदार्थांचे सेवन, लवकरच दिसेल वजनातला फरक

तब्येत पाणी
Updated Jun 10, 2021 | 11:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

वजन कमी करण्याची सुरुवात सकाळी उठल्यापासूनच होते. वजन कमी करण्यात आपण किती यशस्वी होता हे आपल्या न्याहारीवरही अवलंबून असते. सकाळी उठल्यावर जड न्याहारी केल्याने आपले वजन वेगाने वाढण्याची शक्यता असते.

Weight loss
वजन कमी करण्यासाठी न्याहारीत करा या पदार्थांचे सेवन, लवकरच दिसेल वजनातला फरक  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सर्वांना आवडणारे पोहे आरोग्यासाठीही चांगले
  • इडलीत आढळून येतात भरपूर पोषकतत्त्वे
  • पोषक घटकांचा खजिना असतात मोड आलेली कडधान्ये

नवी दिल्ली - वजन कमी (Weight loss) करण्याची सुरुवात (beginning) सकाळी (morning) उठल्यापासूनच होते. वजन कमी करण्यात आपण किती यशस्वी (successful) होता हे आपल्या न्याहारीवरही (breakfast) अवलंबून असते. सकाळी उठल्यावर जड न्याहारी (heavy breakfast) केल्याने आपले वजन वेगाने वाढण्याची (weight gain) शक्यता असते. त्यामुळे अशी न्याहारी घ्या ज्यात खूप कॅलरी (calories) नसतील आणि शरीराला (body) गरजेची असलेली सर्व पोषकतत्त्वेही (nutrition) मिळतील जेणेकरून शरीर अशक्त (weak) होणार नाही. जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ.

१. सर्वांना आवडणारे पोहे आरोग्यासाठीही चांगले

अनेक लोकांना न्याहारीसाठी पोहे खायला आवडतात आणि पोहे हे आरोग्यासाठीही चांगले असतात. यात खूप कॅलरी असत नाहीत, तसेच लोह, पोटॅशियम अशी तत्त्वेही असतात. पोह्याच्या सेवनाने पोट लवकर भरते, बराच वेळ भरलेले राहते आणि हे खाल्ल्याने वजनही वाढत नाही. मात्र पोहे खाताना हे लक्षात ठेवा की त्यावर शेव घालू नका, कारण यात भरपूर कॅलरी असतात.

२. इडलीत आढळून येतात भरपूर पोषकतत्त्वे

उडदाची डाळ, तांदूळ आणि रव्याने तयार केलेल्या इडलीत खूप पोषकतत्त्वे असतात. इडलीला तेलात तळण्याची गरज नसते, तसेच ती पचायलाही सोपी असते. यात प्रथिने, तंतूमय पदार्थही असतात ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र लक्षात ठेवा की वजन कमी करण्यासाठी घरी तयार केलेल्या पीठापासून बनवलेल्या इडलीचेच सेवन करा.

३. दलियाच्या न्याहारीत असतात खूप कमी कॅलरी

दलिया हा एक असा नाश्ता आहे ज्यात इतर पदार्थांच्या तुलनेत खूपच कमी कॅलरी असतात. याचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि वजनही नियंत्रणात राहते. 100 ग्रॅम दलियामध्ये साधारण 20 ग्रॅम तंतूमय पदार्थ असतात ज्यामुळे पोट भरलेले राहते. तसेच वजन कमी करण्यासही मदत करते. जर आपल्याला दलिया खाणे आवडत नसेल तर यात भाज्या आणि जिरे घालून आपण याची चव वाढवू शकता.

४. पोषक घटकांचा खजिना असतात मोड आलेली कडधान्ये

मोड आलेली कडधान्ये ही पोषकतत्त्वांचा खजिना मानली जातात. यात खूप कमी कॅलरी असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. याच्यातल्या प्रथिनांमुळे ताकद मिळते. यात आपण काळे हरभरे, मूग, मटकी, सोयाबीन इत्यादींचे सेवन करू शकता. हा सर्वात चांगला नाश्ता आहे ज्यामुळे सर्व वयाच्या लोकांना फायदा मिळतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी