या ९ दिवसांत असे काय खाल ज्यामुळे वजनही कमी होईल आणि व्रतही पूर्ण होईल?

तब्येत पाणी
Updated Oct 19, 2020 | 15:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

अनेक खाद्यपदार्थ आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करतात. कमी कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ, जास्त फळे आणि भाज्या खाणे चांगले मानले जाते, पण कोणतीही एखादीच गोष्ट आपल्याला वजन कमी करण्यात सहाय्य करत नाही.

Navratri 2020
या ९ दिवसांत असे काय खाल ज्यामुळे वजनही कमी होईल आणि व्रतही पूर्ण होईल, जाणून घ्या इथे 

थोडं पण कामाचं

  • कसा सांभाळाल वजन आणि उपवासाचा तोल?
  • काय आहे शिंगाड्याच्या पोळीची सामग्री आणि कृती?
  • काय आहेत या पदार्थातील पौष्टिक घटक?

मुंबई: अनेक खाद्यपदार्थ (Food items) आपल्याला वजन कमी (weight loss) करण्यासाठी मदत करतात. कमी कार्बोहायड्रेट्स (less carbohydrates) असलेले पदार्थ, जास्त फळे आणि भाज्या (more fruits and vegetables) खाणे चांगले मानले जाते, पण कोणतीही एखादीच गोष्ट आपल्याला वजन कमी करण्यात सहाय्य करत नाही. आवश्यक त्या सर्व गोष्टी एकत्रितपणे (collective food) घेतल्यानेच वजन कमी होईल. अनेकदा लोकांना वाटते की त्यांना भूक (people feel hunger) लागली आहे, पण खरेतर त्यांना तहान लागलेली (thirst) असते. अशावेळी आपण तहानलेले असताना खातो. पण या ९ दिवसांसाठीचा हा डाएट प्लॅन (9 days diet plan) पाहा. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती (immunity power) वाढण्यासोबतच शरीरातील विषारी आणि अपायकारक पदार्थही (toxic ingredients) बाहेर पडतील.

दिवस १: पहिल्या दिवशी राजगिऱ्याची पोळी किंवा उत्तप्पा आणि साबुदाण्याची खिचडी खा.

दिवस २: दुसऱ्या दिवशी उपवासाच्या पिठाचा डोसा किंवा सफरचंदाचे सूप, बटाट्याची भाजी खा.

दिवस ३: साबुदाणा किंवा कमळाच्या बियांची खीर, रताळ्याची खीर असे स्वादिष्ट पदार्थ बनवा.

दिवस ४: उपवासाच्या पिठाचे कस्टर्ड आणि साबुदाण्याची खीर करा. आपण यात फळे आणि सुकामेवाही घालू शकता.

दिवस ५: पालक पनीर आणि कमळाच्या बियांची भाजी (सैंधव मिठासह), केळे आणि आक्रोडाची लस्सी आणि कच्च्या केळ्यांची भाजी बनवा.

दिवस ६: साबुदाण्याची खीर फळांसह बनवा. साबूदाणा दही, अरबी कोफ्ता, फळांचे चाटही आपण खाऊ शकता.

दिवस ७: खिचडी बनवा. साखरेऐवजी गूळ वापरा. टोफू किंवा पनीरच्या सारणाचा रोल तयार करा.

दिवस ८: केळ्याची कटलेट्स बनवा. हे बेक्ड किंवा एअर फ्रायर करून बनवा.

दिवस ९: साबुदाण्याचा उपमा बनवा.

आवश्यक टिप्स

आपण जे काही खाल, ते खूप कमी प्रमाणात खा. ३ तासांच्या अंतराने काही ना काही खा. भरपूर पाणी प्या. चालायला जा. काही वेळ ध्यानधारणा करा. चांगले आणि आवडते संगीत ऐका. जर आपल्याला बरे वाटत नसेल तर उपवास करू नका. यादरम्यान गरजेचे तेवढे प्रोटीन अवश्य घ्या.

शिंगाड्याची पोळी

शिंगाड्यात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, हे कॉलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते आणि आवश्यक ती जीवनसत्वे आणि खनिजे देते. याचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, त्यामुळे हे पचायला सोपे आणि मधुमेहासाठी चांगले असते. ही पोळी नेहमीच्या आहारातही समाविष्ट केली जाऊ शकते.

साहित्य

२०० ग्रॅम शिंगाड्याचे पीठ, १/२ चमचा सैंधव मीठ, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, १ चमचा किसलेले आले, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ बारीक केलेला बटाटा, १ खिसलेली काकडी, आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप.

एका भांड्यात सर्व साहित्य एकजीव करून घ्या. नॉनस्टिक तव्याला तेल किंवा तूप लावा. आता एका चमच्याने हे पीठ पसरवा. बाजूंनी तेल सोडा आणि उलटताना दोन्ही बाजूंनी भाजा. गरमागरम वाढा.

न्यूट्रिशनल व्हॅल्यू

(प्रति 100 ग्रॅमसाठी)

फॅट- 1.8 ग्रॅम

प्रोटीन- 13 ग्रॅम

एनर्जी- 457 किलो कॅलरी

कार्ब्स- 96 ग्रॅम

फायबर- 7 ग्रॅम

कॅल्शियम- 68 मिलीग्रॅम

आयर्न- 8.4 मिलीग्रॅम

(भव्या सिंह, एग्झिक्यूटिव्ह न्यूट्रिशनिस्ट, नोएडा यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी