तुमच्या घरी नवीन तान्हा पाहुणा आलाय? मग टेस्टची घ्या काळजी; २० पेक्षा जास्त द्याव्या लागतात टेस्ट

जन्मानंतर ४८ तासांच्या आत मध्येच त्या इवलुश्या नवजात बाळाचे ६० किंवा त्यापेक्षा जास्त टेस्ट कराव्या लागतात. यातील महत्त्वाच्या टेस्ट कोणत्या हे तुम्हाला माहित आहे का? नाही आज आपण या लेखात त्याचविषयी माहिती घेण

Have you ever had a new baby Then take care of the test
तुमच्या घरी नवीन तान्हा पाहुणा आलाय? मग टेस्टची घ्या काळजी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • जन्मानंतर ४८ तासांच्या आत नवजात बाळाचे ६० किंवा त्यापेक्षा जास्त टेस्ट कराव्या लागतात.
  • या टेस्टच्या द्वारे बाळाच्या आरोग्याविषयी पूर्ण माहिती मिळते.
  • १०० पैकी एक बाळ या विकारासह जन्म घेतो

नवी दिल्ली : जन्मानंतर ४८ तासांच्या आत मध्येच त्या इवलुश्या नवजात बाळाचे ६० किंवा त्यापेक्षा जास्त टेस्ट कराव्या लागतात. यातील महत्त्वाच्या टेस्ट कोणत्या हे तुम्हाला माहित आहे का? नाही आज आपण या लेखात त्याचविषयी माहिती घेणार आहोत. बाळ जन्माला आले की त्याच्या काही टेस्ट करणे अत्यंत गरजेचे असते. ज्याला स्क्रीनिंग टेस्ट देखील (newborn screening tests) म्हणतात. या टेस्टच्या द्वारे बाळाच्या आरोग्याविषयी पूर्ण माहिती मिळते. या टेस्ट केल्या जाण्याचे कारण म्हणजे यातून बाळाला कोणता दुर्लभ आजार आहे का? त्याला कोणती गंभीर शारीरिक समस्या आहे का? त्याबद्दल कळते. या सर्व टेस्ट करणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि या टेस्ट जर होत नसतील तर पालकांनी स्वत:हून डॉक्टरांना विचारून या टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. गरजेचे असते.

किती टेस्ट केल्या जातात?

 

प्रत्येक राज्यामध्ये जन्माला आलेल्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात परंतु काही टेस्ट सर्व राज्यांमध्ये समान असतात आणि त्या प्रत्येक मुलावर केल्याच पाहिजेत. बाळाची ३५ कोर आणि २६ सेकंड्री ब्‍लड टेस्‍ट केल्या गेल्याच पाहिजेत. बाळामध्ये कंजेनाइटल हार्ट डिफेक्‍ट आणि ऐकण्याची अक्षमता असल्याच्या विकारांसाठीही काही टेस्ट केल्या जातात. या गोष्टी अनेक पालकांना माहित नसतात पण या गोष्टी माहित असायला हव्यात. 

एपगार स्‍केल 

 

ही एक महत्त्वाच्या टेस्ट असून जन्म झाल्यावर लगेच आणि पहिल्या ५ मिनिटांत बाळाची स्थिती जाणण्याकरता ही टेस्ट केली जाते. या टेस्टमध्ये बाळाची हार्ट रेट, मसल टोन आणि इतर गोष्टींबद्दल देखील समजते. 

कंजेनाइटल हार्ट डिजीज स्‍क्रीनिंग 

ही अजून एक महत्त्वाची टेस्ट असून सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन यांच्यानुसार बाळाच्या जन्मानंतर बाळामध्ये कोणता जन्मत: हृदयविकार आहे का हे तपासण्यासाठी ही टेस्ट केलीच पाहिजे. १०० पैकी एक बाळ या विकारासह जन्म घेतो. यावर वेळीच उपचार नाही झाले तर बाळ अपंग होऊ शकते किंवा त्याचा जीव जाऊ शकतो.

अन्य टेस्ट

याशिवाय अजून काही टेस्ट आहेत ज्या करणे गरजेचे असते. त्यामध्ये २१  प्रकारच्या ब्लड टेस्टचाही समावेश होतो. एका ब्लड टेस्ट मधून २१ प्रकारची तपासणी केली जाते ज्यात जेनेटिक, मेटाबोनिक, हार्मोंनल आणि फंक्‍शनल टेस्‍ट केली जाते. यात हाइपोथायराइडिज्‍म, कंजेनाइटल एड्रेनल हाइपरप्‍लासिया, बायोटिनिडेस डेफिशिएंसी, मेपल सिरप यूरीन डिजीज, गेलेक्‍टोसेमिया, होमोसिस्‍टिनूरिया आणि सिकेल सेल एनीमिया यांचा अंतर्भाव असतो. हियरिंग टेस्‍ट देखील बाळाच्या जन्मानंतर केल्या जाणाऱ्या टेस्ट मधील महत्त्वाची टेस्ट असून अमेरिकन एकेडमी ऑफ पीडियाट्रिक्‍स यांच्या सल्ल्यानुसार ही टेस्ट आवर्जून करावी आणि बाळाच्या ऐकण्याची क्षमता तपासावी.

या टेस्ट सुद्धा केल्या जातात

बाळाचे वजन, उंची आणि डोक्याची रुंदी मोजली जाते. हात आणि पायांची बोटे मोजली जातात आणि शरीरातील कोणता अवयव असामान्य तर नाही या याची तपासणी केली जाते. स्पर्श करून बाळाच्या आतील अवयव जसे की किडनी, लिवर आणि प्लीहा यांची तपासणी केली जाते. बाळाची रिफ्लेक्‍सेस, हिप रोटेशन आणि अम्बिलिकल स्‍टंप पाहिली जाते. बाळाच्या मुत्राची आणि विष्ठेची देखील तपासणी होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होण्याआधी बाळाला व्हिटॅमिनचे इंजेक्शन आणि कधी कधी हेपेटाइटिस बी च्या लसीचा पहिला डोस दिला जातो.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी