दररोज तीन अंडी खाणे फायद्याचे, परिणाम पाहून होईल आश्चर्य

अंड्यात मुबलक प्रमाणात कॅलरी, प्रोटीन, हेल्दी फॅट, फोलेट, कॅल्शियम, झिंक, फॉसफरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिट्यामिन बी, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन बी2 इतके पोषक तत्वे आहेत.

Having three eggs daily is good for health and shows surprising effects on body
अंडी   |  फोटो सौजन्य: Facebook

अंड्यात मिळतात हे पोषक तत्व 

अंड्यात कॅलरी, प्रोटीन, हेल्दी फॅट, फोलेट, कॅल्शियम, झिंक, फॉसफरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी५, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी6 सारखे महत्वाचे पोषक घटक मिळतात. यातील अनेक घटक कमी पडू नये म्हणून लोक विविध मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खातात. परंतु, जर आपण रोजच्या आहारात अंडी खाल्ली तर या मल्टी व्हिटॅमिनपासून आपणास सुटका मिळू शकते. त्यासोबत अंडी खाणे औषध खाण्यापेक्षा कमी खर्चीक काम आहे. 

हार्मोन्ससाठीही फायदेशीर 

अंड्यात शरीराला लागणारे खूप घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. इतकेच नाही तर आपल्या शरीरात स्रावणाऱ्या हार्मोन्ससाठीसुद्धा हे घटक खूप फायद्याचे ठरतात. अंड्याच्या बलकात कोलेस्ट्रॉल अढळते. जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल ह्रदयासाठी चांगले नाही असे काहीजण म्हणत असतात. परंतु, हेच कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात ग्रहण केल्यास ते शरीरासाठी अत्यंत गरजेचे असते. यापासुनच स्टेरॉईड हार्मोन्स, टेस्टोस्टेरॉन एस्ट्रोजन आणि कोर्टिसोल बनत असते. जे आपल्यासाठी खूप महत्वाचे ठरते. 

हार्टशाठी फायदेशीर फायदेमंद

अंड्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे आपल्या ह्रदय धडकण्याची गती नियंत्रीत केली जाते. तसेच यामुळे रक्त क्लॉट होण्याचा धोकाही कमी होतो. रक्तदाबही कमी होतो, धमण्यांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. या सर्वांचा परिणाम म्हणून आपले ह्रदय सुदृढ राहते. 

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

अंडे खाण्याने माणसाला इतके पोषक घटक मिळत असतात. त्यासोबतच ते वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात . तुम्ही अंड्याचा नाष्टा करत असाल तर तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला वजन वाढवणारे अतिरिक्त जेवण कमी प्रमाणात जाते. याचा थेट परिणाम तुमच्या वजनावरती होतो.  

डोळ्यांसाठी फायदेशीर

अंडी खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य खूप चांगले राहते. अंड्यात ल्यूटेन नावाचा घटक असतो, जो आपल्या डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असतो. जेक्सांथिन नावाचा घटक आपल्याला अल्ट्रा व्हॉयलेट किरणांच्या घातक परिणामांपासून दूर ठेवते. यासोबतच अंड्यात व्हिटॅमिन ए आणि झिंकसुद्धा मुबलक प्रमाणात भेटते. जे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. 

हाडांसाठी उपयुक्त

अंड्यात व्हिटॅमिन डी, फॉस्फरस आणि झिंक मिळते, ते आपली हाडे मजबुत करण्यासीठी फायदेशीर ठरतात. अंड्यात शरीरासाठी खूप फायद्याचे असणारे लोहसुद्धा मुबलक प्रमाणात मिळते.  

मेंदूसाठीही उपयुक्त

गर्भवती महिलेच्या गर्भातील शिशूच्या मेंदूच्या विकासासाठी अंडी खाणे खूप फायद्याचे ठरते. नवीन जन्मलेल्या बाळांसाठीही हे खूप महत्वाचे असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी