मुंबई : जर तुम्ही डायबिटीजने ग्रस्त असाल तर तुम्हाला तुमच्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यावे लागते. डायबिटीजमध्ये भूकही खूप लागते. त्यामुळे असा डाएट असला पाहिजे ज्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहील. यासाठी बेसनची पोळी हा एक चांगला पर्याय असू शकतो. इतकंच नव्हे तर ज्यांना ब्लड प्रेशर, शारिरीक थकवा अथवा वेट लॉस करायचा असेल तर त्यांना बेसनची पोळी का एक उत्तम पर्याय आहे.
बेसनमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते यासाठी हा लो ग्लायसेमिक इंडेक्सचा असतो. याच कारणामुळे वेट लॉससोहत डायबिटीजमध्येही फायदेशीर आहे. इतकंच नव्हे तर ज्यांना मसल्स बनवायचे आहेत अशा व्यक्तींनी बेसनची पोळी जरूर खावी. यामुळे ग्लुकोजची पातळीही संतुलित राहते. जाणून घ्या बेसनची पोळी खाण्याचे आणखी काही फायदे