जाणून घ्या तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे सब्जाचं बी 

Chia Seed Benefits: हेल्दी बियांमध्ये सब्जाचं बी हे सर्वात टॉपवर आहे. कारण यात सर्व आवश्यक पोषक तत्त्व असतात. ज्याची गरज आपल्या शरीराला असते. या बिया बऱ्याच आजारांवरही औषध म्हणून काम करतात. 

Chia Seeds
जाणून घ्या तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे सब्जाचं बी   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

 • पोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो.
 • . सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर असतात.
 • सब्जा हा सुपरफूड प्रमाणे असते. यात चार ग्रॅमपर्यंत प्रोटीन, ९ ग्रॅम चांगलं फॅट ज्यात ५ ओमेगा-३ एस असतात.

Health Benefits of Chia Seeds: पोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो. सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर असतात. सब्जा हा सुपरफूड प्रमाणे असते. यात चार ग्रॅमपर्यंत प्रोटीन, ९ ग्रॅम चांगलं फॅट ज्यात ५ ओमेगा-३ एस असतात. जवळपास १८ टक्के कॅल्शियम आणि ३० टक्के मॅग्नेशिअम असतं.

यात झिंक, व्हिटामिन बी ३ (नियासिन) , पोटॅशिअम, व्हिटामिन बी १ (थायमिन) आणि व्हिटामिन बी-२ आणि व्हिटामिन ईचं चांगलं प्रमाण असतं. एक चमचा सब्जाचं बी शरीरात बरेच सकारात्मक बदल आणतात. पण हे घेण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे. कारण हे तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात गेलं तर त्याचे नुकसान देखील गंभीर होतात. 

अॅन्टिऑक्सिडेंटनं भरलेलं सब्जाचं बी

सब्जाचं बी हे अॅन्टिऑक्सिडेंटचं पॉवर हाऊस आहे. यात सर्व प्रकारचे कार्ब्स फायबर असतात. यात हाय क्वॉलिटी असलेलं प्रोटीन असतं. जाणून घ्या सब्जाचे फायदे 

 • हाय फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण अधिक असल्यानं हे वजन कमी करण्यास फायदेशीर असतं. 
 • सब्जा हे हृदयरोगाचा धोका कमी करतं कारण हे ब्लड सर्कुलेशन चांगलं करतं. 
 • यात असलेले कॅल्शियम आणि ओमेगा फॅटी अॅसिड हाडं मजबूत आणि लिगामेंट्स चांगलं करतं. 
 • सब्जा ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 
 • हे शरीर आणि हाडांची सूज कमी करण्यासाठी सक्षम आहे. 
 • सब्जा कॉस्टिपेशन आणि पोटाची समस्यावर खूप फायदेशीर आहे.

सब्जा जास्त प्रमाणात खाल्ल्यास होणारे साइड इफेक्ट 

 • गॅस्ट्रोइंटेस्टाइनलची समस्या उद्भवते. हार्ड स्टूलपासून अतिसार, सूज आणि आतड्यांमध्ये गॅस होण्यास सुरूवात होते. 
 • ओटीपोटात वेदना होण्याची शक्यता आहे. 
 • कमी रक्तदाब किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो. कारण त्यामध्ये असलेले ओमेगा -3 फॅटी अॅसिड रक्त पातळ करतात. 
 • एलर्जी होण्याची शक्यता असते. शरीरावर पुरळ, पित्त आणि डोळ्यांमधून पाणी येऊ शकतं. बऱ्याचंदा श्वास घेण्यास त्रास होतो, उलटी, अतिसार होणं, जीभेला सूज इत्यादी त्रास होतो. 

दररोज एक चमचा सब्जाचं बी घेणं पुरेसं आहे. गरोदरपणात हे घेणे योग्य नाही कारण जास्त प्रमाणात यामुळे समस्या उद्भवू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी