आईचं दूध मिळू न शकणाऱ्या मुलांना द्या बकरीचं दूध, बाळ होईल सुदृढ

तब्येत पाणी
Updated Jul 05, 2019 | 00:08 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

नवजात बाळासाठी आईच्या दुधापेक्षा दुसरं काहीच चांगलं नसतं. पण अनेकदा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आई जर आपलं दूध बाळाला पाजू शकली नाही. तर तेव्हा बकरीचं दूध बाळाला पाजावं. जाणून घ्या बकरीच्या दुधाचे फायदे...

Milk
जाणून घ्या बकरीच्या दुधाचे गुणधर्म, नवजात बाळासाठी उपयुक्त (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: बकरीचं दूध चवीला जरी चांगलं नसलं आणि त्याचा वेगळा गंध आपल्याला ते पिण्यापासून थांबवत असलं तरीही बकरीचं दूध हे औषधीयुक्त गुणांनी परीपूर्ण असतं. ज्या नवजात बालकांना आईचं दूध मिळत नाही, त्यांना बकरीचं दूध अवश्य पाजावं. या दूधात गायीच्या दुधापेक्षा अधिक पोषकतत्वे असतात, जे बाळाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात.

बकरीचं दूध नवजात बालकाच्या आणि त्याच्या आतड्यांना मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. पचायला हलकं असण्याबरोबरच बाळांची प्रतिकार शक्ती वाढविण्याचं काम बकरीचं दूध करतं. अनेक वेळा मुलांना पोट्याच्या समस्या या दूधामुळे होतात, ज्याला गॅस्ट्रोएन्टराइटिस म्हटलं जातं. पण हा त्रास बकरीचं दूध पिल्यानं होत नाही. तर जाणून घ्या बकरीच्या दूध बाळांसाठी कसं उपयुक्त ठरतं ते...

बकरीच्या दुधाचे फायदे, मोठ्यांसाठीही आहे आरोग्यदायी

  1. बकरीचं दूध हे आतड्यांची सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
  2. बकरीच्या दुधात असलेलं प्रोटीन बाळाच्या शारीरिक विकासासाठी लाभदायक असतं.
  3. बकरीचं दूध पोटाच्या समस्या दूर करतं आणि पचनशक्ती मजबूत करतं.
  4. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचं कामही बकरीचं दूध करतं.
  5. बकरीच्या दुधात कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असतं यामुळे हाडांना मजबूती मिळते.
  6. बकरीचं दूध कोलेस्ट्रॉल कंट्रोल करत आणि हृदयासंबंधीत आजार दूर करतं.
  7. बकरीच्या दुधात असलेलं पोटॅशिअम ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं.
  8. डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजारांमध्ये प्लेटलेट्स वाढवण्याचं काम बकरीचं दूध करतं.
  9. गायीच्या दूधा पेक्षा ही चांगलं आहे बकरीचं दूध

रिसर्चमध्ये सिद्ध झालंय की गायीच्या दूधा पेक्षा बकरीचं दूध उत्तम असतं. ते आईच्या दुधासमान बाळासाठी आरोग्यदायी ठरतं. बकरीचं दूध शरीरातील नैसर्गिक प्रोबायोटिक ऑलिगोसेकेराइड्स, कोलाई सारखे नुकसानकारक बॅक्टेरिया संपवतं.

डिस्क्लेमर: वरील लेखामध्ये दिलेल्या टिप्स आणि सल्ला हा सामान्य माहितीच्या आधारे दिला गेलाय. जर आपल्याला याचा वापर करायचा असेल तर त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आईचं दूध मिळू न शकणाऱ्या मुलांना द्या बकरीचं दूध, बाळ होईल सुदृढ Description: नवजात बाळासाठी आईच्या दुधापेक्षा दुसरं काहीच चांगलं नसतं. पण अनेकदा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आई जर आपलं दूध बाळाला पाजू शकली नाही. तर तेव्हा बकरीचं दूध बाळाला पाजावं. जाणून घ्या बकरीच्या दुधाचे फायदे...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola