Black Tea: ब्लॅक टी पिण्याने कमी होतो मृत्यूचा धोका, चहा आणि सिगरेटचं वेगळंच कनेक्शन

ब्लॅक टी पिण्यामुळे मृत्यूचा धोका कमी होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. त्याचप्रमाणं दुधाचा चहादेखील गुणकारी ठऱत असल्याचं दिसून आलं आहे.

Black Tea
ब्लॅक टी पिण्याने कमी होतो मृत्यूचा धोका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ब्लॅक टीमुळे मृत्यूचा धोका होतो कमी
  • नव्या अभ्यासातील निष्कर्ष
  • दुधाचा चहा पिणंही तितकंच फायद्याचं

Black Tea: भारतात (India) चहा (Tea) हे सर्वाधिक लोकप्रिय पेय (Popular drink) आहे. आपल्या देशात पाण्याखालोखाल सर्वाधिक पिलं जाणारं पेय म्हणून चहाचं नाव घेता येईल. घरोघरी दिवसातून अनेकदा तयार होणारा हा चहा विविधतेत एकतेचं खरं प्रतिक आहे. काहींना ब्लॅक टी प्यायला आवडतं, काहींना दुधाचा चहा आवडतो. प्रत्येक भागात चहा तयार करण्याची पद्धत बदलत जाते. जर तुम्हालाही चहा पिणं आवडत असेल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार ब्लॅक टी पिण्यामुळे मृत्यूचा धोका (Danger of death) कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. 

‘ब्लॅक टी’ आहे अमृततूल्य

अमृत प्यायलेली व्यक्ती अमर होते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे अमृत नावाच्या काल्पनिक पेयाची उपमा ही चहाला दिली जाते. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार दररोज 2 कप ब्लॅक टी पिणाऱ्यांमध्ये मृत्यूची शक्यता 12 टक्क्यांनी कमी होत असल्याचं म्हटलं आहे. काळ्या चहात मोठ्या प्रमाणावर अँटी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसिज आणि स्ट्रोक यापासून वाचण्यासाठी ब्लॅक टीची मदत मिळत असते. विशेष म्हणजे ब्लॅक टी प्रमाणे दुधाच्या चहामुळेही तेवढाच फायदा होतो. या अभ्यासातून समोर आलेल्या निरीक्षणानुसार दिवसातून दोनपेक्षा जास्त कप चहा पिण्यामुळे शऱीराला धोका पोहोचण्याची शक्यता असते. मात्र दिवसातून एक ते दोन कप चहा हा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. 

अधिक वाचा - Check Cholesterol: हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी ‘या’ वयापासून सुरु करा कोलेस्ट्रॉलची तपासणी

धूम्रपान करणारे पितात अधिक चहा

धूम्रपान कऱणाऱ्यांना सोबत चहा पिण्याची सवय असते. त्यामुळे प्रत्येक वेळी धूम्रपान करताना ते चहा पित असतात. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा आरोग्यासाठी घातक असतो. त्याचप्रमाणे सिगरेट ओढणाऱ्या व्यक्ती जर दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा चहा पित असतील, तर त्याचा विपरित परिणाम त्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. शिवाय अतिरिक्त चहाप्रमाणेच सिगरेटदेखील शरीराचं नुकसान करते आणि त्यातून वेगळे आजार निर्माण होऊ शकतात. सिगरेट बंद करणे आणि दिवसातून दोनच कप चहा पिणे हाच यावरचा सर्वोत्तम मार्ग असल्याचं सांगितलं जातं. 

अधिक वाचा - Healthy Lifestyle Mistakes: रोजच्या जगण्यात तुम्हीही या चुका करता का? वेळीच करा बदल

अनेक गुण असणारा ब्लॅक टी

ब्लॅक टीमध्ये पॉलिफिनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. पॉलिफिनॉल्समुळे ब्लड  प्रेशर, टाईप-2 डायबेटिस आणि कॅन्सर यासारख्या आजारांचा धोका कमी होत असल्याचं आजपर्यंतच्या अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे. मात्र ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी साखरयुक्त चहा पिणे टाळावं, असा सल्ला दिला जातो. 

डिस्क्लेमर - ब्लॅक टीच्या फायद्यांबाबतची ही काही सामान्य निरीक्षणं आणि टिप्स आहेत. तुम्हाला आरोग्याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी