Today's Health Tips: या दिवसात आहारात काकडीचा करा समावेश; आरोग्यासाठी या बाबींसाठी आहे विशेष फायदेशीर

तब्येत पाणी
Updated Apr 02, 2022 | 11:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Health Tips | उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे खूप आव्हानात्मक असते, परंतु आजच्या घडीला अशी अनेक फळे आणि भाज्या बाजारात उपलब्ध आहेत ज्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. काकडी हे असेच एक फलदायी फळ आहे, जे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. काकडी फायदेशीर पोषक तसेच अनेक वनस्पती-आधारित संयुगे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते.

 Health benefits of cucumber in summer days
काकडी आरोग्यासाठी या बाबींसाठी आहे विशेष फायदेशीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे खूप आव्हानात्मक असते.
  • उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका वाढत असल्याने रोजच्या आहारात काकडीचा समावेश करावा.
  • काकडीमधील पाण्याचे प्रमाण हे खूप आरोग्यदायी असते.

Health Tips | मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे खूप आव्हानात्मक असते, परंतु आजच्या घडीला अशी अनेक फळे आणि भाज्या बाजारात उपलब्ध आहेत ज्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. काकडी हे असेच एक फलदायी फळ आहे, जे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. काकडी फायदेशीर पोषक तसेच अनेक वनस्पती-आधारित संयुगे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते. काकडीमधील पाणी भरून काढणारे गुणधर्म हे उन्हाळ्यासाठी सर्वात पसंतीचे आणि आरोग्यदायी बनवतात. सॅलडपासून ते पेयांपर्यंत, खाण्यापासून ते चेहऱ्यावर लावण्यापर्यंत सर्वांगीण आरोग्यासाठी काकडीचे अनेक फायदे आहेत. (Health benefits of cucumber in summer days). 

अधिक वाचा : वाढत्या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका वाढत असल्याने रोजच्या आहारात काकडीचा समावेश केल्यास या समस्येपासून दूर राहता येते. काकड्यांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि विरघळणारे फायबर असते, ज्यामुळे ते हायड्रेशनला चालना देण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आदर्श बनवतात. काकडीत असलेले नैसर्गिक गुणधर्म हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. 

अनेक आजारांपासून मिळते सुरक्षा 

काकडीत शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात, ज्यामुळे कॅन्सरसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. मुक्त रॅडिकल्समुळे हृदय, फुफ्फुस आणि स्वयंप्रतिकार रोगांचा धोका वाढतो. काकडीचे आरोग्य फायदे जाणून घेण्यासाठी केलेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की ३० दिवस काकडीचे सेवन केल्याने शरीरातील अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण सुधारू शकते.

अधिक वाचा : २०२२ चा मार्च महिना १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरला

काकडीतील पाण्याचे प्रमाण फायदेशीर 

काकडीमधील पाण्याचे प्रमाण हे खूप आरोग्यदायी असते. तापमानातील बदलांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी काकडीचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. काकडीचे सेवन केल्याने शरीराची रोजची पाण्याची गरज पूर्ण होण्यास मदत होते. ४४२ मुलांवर केलेल्या अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की शरीरातील पाण्याचे प्रमाण सुधारण्यासाठी काकडीचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते

काकडीचे सेवन डायबिटीजसाठी देखील फायदेशीर ठरू शकते, कारण ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि डायबिटीजचा धोका टाळण्यास मदत करते. प्राणी आणि टेस्ट-ट्यूब अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की डायबिटीजच्या समस्येमध्ये काकडीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. उंदरांवरील अभ्यासात असे आढळून आले की काकडीच्या सालीचा अर्क मधुमेहाशी संबंधित बहुतेक धोका कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

वजन कमी करण्यातही फायदेमंद 

काकडी तुम्हाला वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते. कारण काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात, म्हणून ते सेवन केल्याने वजन वाढत नाही. १०० ग्रॅम काकडीत फक्त १६ कॅलरीज असतात. म्हणजेच तुम्ही अतिरिक्त कॅलरीजशिवाय काकडी खाऊ शकता. ताजेपणा आणि चव वाढवण्यासोबतच काकडीची कोशिंबीर आणि रायता तुमच्या आरोग्यासाठी इतरही अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी