सकाळी रिकाम्या पोटी खा कढीपत्ता, वेट लॉस आणि दाट केसांसाठी जबरदस्त फायदा

Benefits of Curry leaves: कढीपत्ता ही काही फक्त जेवण स्वादिष्ट बनवणारी बाब नव्हे. कढीपत्ता हा अतिशय आरोग्यदायी असतो. कढीपत्त्याचे (Curry leaves) इतरही अनेक जबरदस्त लाभ आहेत

Benefits of Curry leaves
कढीपत्त्याचे फायदे 

थोडं पण कामाचं

  • कढीपत्ता हा अतिशय आरोग्यदायी असतो
  • वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता अत्यंत उपयुक्त
  • मधुमेह (Diabetes), केसांचा कोंडा, केस गळणे (Hair fall) इत्यादींसारख्या अनेक समस्यांवर किंवा आजारांवर कढीपत्ता फायदेशीर

नवी दिल्ली: जेवण स्वादिष्ट बनवण्यासाठी कढीपत्त्याची फोडणी दिली जाते. त्याची एक वेगळीच चव असते. मात्र कढीपत्ता ही काही फक्त जेवण स्वादिष्ट बनवणारी बाब नव्हे. कढीपत्ता हा अतिशय आरोग्यदायी असतो. त्यामुळेच जेवणात त्याचा वापर सढळपणे केला जातो. मात्र इतकेच नाही तर कढीपत्त्याचे (Curry leaves) इतरही अनेक जबरदस्त लाभ आहेत. वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता अत्यंत उपयुक्त असतो. याशिवाय मधुमेह (Diabetes), केसांचा कोंडा, केस गळणे (Hair fall) इत्यादींसारख्या अनेक समस्यांवर किंवा आजारांवर कढीपत्ता फायदेशीर ठरतो. कढीपत्ता हा बहुगुणी असतो. कढीपत्त्याचे वेगवेगळे फायदे आणि त्याचा वापर कसा करायचा ते पाहूया. (Health : Benefits of Curry leaves on weight loss & hair fall )

केस गळती थांबवण्यासाठी 

अलीकडच्या काळात केसगळती ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. अकाली केस गळणे, टक्कल पडणे यासारख्या तक्रारी हल्ली सर्रास आढळतात. या समस्येवर कढीपत्ता अतिशय उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही केसांना जे तेल लावता त्यामध्ये १ मूठ कढीपत्ता टाकून उकळावे. जेव्हा तेल आणि कढीपत्ता या दोघांचाही रंग गडद होईल तेव्हा उकळणे थांबवावे. त्यानंतर तेल थंड करून एका भांड्यात ठेवावे. या तेलाला रात्री केसांना लावावे आणि सकाळी केस धुवावेत. यामुळे केस गळण्याच्या तक्रारीवर चांगलाच उपयोग होतो.

केसातील कोंड्यांच्या समस्येसाठी

केसात कोंडा होणे ही एक सर्वत्र आढळून येणारी तक्रार आहे. यासाठी कढीपत्त्याची चांगली पातळ पेस्ट बनवावी. या पेस्टला खारट ताकामध्ये मिसळावी आणि त्या मिश्रणाने केस व्यवस्थित धुवून घ्यावेत. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा करावे.

वजन कमी करण्यासाठी

वाढलेले वजन, सुटलेले पोट यामुळे अनेकजण सध्या त्रस्त असतात. त्यासाठी अनेक प्रयत्न करूनदेखील फारसा उपयोग होताना अनेकांना दिसत नाही. यासाठी १० ते २० कढीपत्त्याची पाने पाण्यात उकळावीत. त्यानंतर पाणी गाळून घ्यावे. यात एक चमचा मध आणि लिंबूचा रस टाकावा. त्याचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास नक्कीच उपयोग होतो.

मधुमेहासाठी

सकाळी उपाशी पोटी ८ ते १० ताजी कढीपत्त्याची पाने चावून खावीत किंवा त्या पानांचा रस काढून प्यावा. याशिवाय याचा वापर ड्रिंक, भात, सॅलड, जेवणातदेखील केला जाऊ शकतो.

काही पदार्थांचे सेवन करणं टाळावे

अनेकवेळा आहारतज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी आपल्याला काही डाएट प्लान देत असतात. त्यात काही पदार्थांचे सेवन करु नका असे सांगितले जाते. बहुतेक जण फॅट, प्रोटिन्स किंवा दुसरे खनिजांचे सेवन करत नाहीत. परंतु हे चुकीचे आहे. जाणकारांच्या मते, प्रत्येक पोषक तत्वांपासून बनलेले पदार्थ आपल्या डाएटमध्ये काही प्रमाणात असणं आवश्यक आहे. अर्थात बाहेरचे पदार्थ, जंक फूड हे मात्र आरोग्यासाठी अयोग्यच असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी