उन्हाळ्याच्या दिवसांत तूप खाण्याचे आहेत हे फायदे

तब्येत पाणी
Updated May 03, 2021 | 15:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयुर्वेदात तूप खाणे शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी मानले आहे. तुपाच्या सेवनाने गरजेची पोषणतत्वे मिळतात. तसेच पित्तही शांत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत साधारणपणे तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. 

ghee
उन्हाळ्याच्या दिवसांत तूप खाण्याचे आहेत हे फायदे 

थोडं पण कामाचं

  • तुपामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडसोबत व्हिटामिन ए आणि सीही असते
  • आयुर्वेदात शरीराला थंडावा प्रदान करण्याचे काम तूप करतेे
  • जर तुम्हाला एखादी आरोग्याची समस्या असेल तर तुपाचे सेवन करण्याआधी आरोग्यतज्ञांचा सल्ला जरूर घ्या

मुंबई:  उन्हाळ्याच्या दिवसांत तुपाचे सेवन केल्याने शरीर थंड राहते. तुपामुळे आपली प्रतिकारकक्षमता फिट राहते. एक्सपर्टनुसार  तुपामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड, व्हिटामिन ए आणि सी असते. तूप खाल्ल्याने शरीर स्वस्थ राहते. तुम्हाला माहीत आहे का उन्हाळ्याच्या दिवसांत तूप खाल्ल्याने शरीरास कोणकोणते फायदे मिळतात. जाणून घ्या...

हेल्दी फॅट्सचे चांगले प्रमाण

तज्ञांनुसार आपल्या शरीराच्या योग्य विकासासाठी चांगले म्हणजेच हेल्दी फॅट्स असणेही गरजेचे असते. फॅट आपल्या शरीराला पोषकतत्वे आणि हार्मोन उत्पादित करण्यास मदत करतात. जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत तुपाचे सेवन केले तर  तुम्ही तंदुरुस्त राहू शकता. 

शरीराला हायड्रेट ठेवते

उन्हाळ्याच्या दिवसांत आपले शरीर डिहायड्रेट होते. जर उन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यामध्ये तुपाचा वापर केल्यास तर तुमचे शरीर हायड्रेट होण्यापासून वाते. याच्या सेवनाने त्वचा नेहमी कोमल आणि स्वस्थ राहते. 

इम्युनिटी वाढवण्यास होते मदत

तुपामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते. जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत तुपाचे सेवन केले तर यातील ब्युटिरिक अॅसिड आणि फॅटी अॅसिड आपली इम्युनिटी वाढण्याचे काम करते. तुपामध्ये व्हिटामिन ए आणि व्हिटामिन सीचे प्रमाण खूप असते. 

पचनशक्ती सुधारते

रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने पाचनशक्ती सुधारते. तुम्हाला पित्ताचा त्रास असल्यास तो नियंत्रित करण्यासाठी तुपाचे सेवन जरूर करावे. यात अँटीफंगल आणि अँटीव्हायरल असे गुण असतात. ज्यामुळे अनेक आजारांशी लढता येते. 

उन्हाळ्यात शरीर राहते थंड

तज्ञांनुसार तुपाचे सेवन केल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते. तज्ञांनुसार शरीरात ओलावा टिकून राहतो. तसेच त्वचा नरम आणि मुलायम राहते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी