Health benefits: वृद्धांनाही तरूण बनवणारा हा ज्यूस, पुरूषांसाठी आहे अमृतासमान

तब्येत पाणी
Updated Apr 15, 2019 | 18:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Health benefits for mens: संत्र खाल्यानं केवळ बिघडलेली तोंडाची चवच नाही सुधारत तर आरोग्याच्या दृष्टीनं संत्र खूप उपयुक्त आहे. फर्टिलिटी वाढवण्यासोबतच इतर काही आजारांना दूर पळविण्यासाठी संत्राचा उपयोग होतो.

health benefits of oranges
संत्र्याचे उपयोग  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी या गुणांनी परिपूर्ण असलेलं संत्र पुरूषांच्या शुक्राणूंची क्वॉलिटी सुधरवण्याचं काम करतं. यासोबतच शुक्राणूंना गती देण्याचं काम ही संत्र करतं. यामुळं पुरूषांच्या फर्टिलिटीमध्ये सुधारणा होते. म्हणूनच ज्या पुरूषांमध्ये वंध्यत्व आलेलं बघायला मिळतं. त्यांनी दररोज भरपूर प्रमाणात संत्री खावीत.

संत्र्यामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कोलिन, कॅल्शियम, कॉपर आणि व्हिटॅमिन बी-१ मोठ्या प्रमाणात आढळतं. जेव्हा संत्र इतक्या गुणांनी परिपूर्ण आहे तर त्यात इतर अनेक रोग्यांसोबत लढण्याची ताकद आहे. कमी कॅलरी आणि हाय फायबर रिच असल्यानं ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांना संत्र खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं.

जाणून घ्या संत्र्याचे इतरही गुण:

  • वंध्यत्वात सुधारणा : ज्या पुरुषांचे शुक्राणू कमजोर आणि कमकुवत असतात त्यांच्यासाठी संत्री खूप उपयुक्त ठरतात. अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी शुक्राणूंची क्वॉलिटी सुधारतात. व्हिटॅमिन आणि फॉलिक ऍसिड शुक्राणूंना सुदृढ बनवतात.

 

  • मेंदूसाठी फायदेशीर: संत्र्यामध्ये असलेल्या फॉलिक ऍसिड किंवा फॉलेट आणि व्हिटॅमिन बी मेंदूच्या चांगल्या विकासासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. पोषक तत्त्वांनी भरलेले असल्यामुळे गर्भवती महिलांसाठीही संत्री खाणं चांगलं आहे. त्यामुळे गर्भातील बाळाची चांगली वाढ होते. सोबतच बाळामध्ये न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर होण्याची भीती मावळते. 

 

  • रोग प्रतिकार शक्तीत वाढ: संत्री व्हिटॅमिन सी चा खूप चांगला स्रोत आहे. संत्र्यात अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळं शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसंच शरिरातील फ्री रॅडिकल्सपासून आपला बचाव करते.

 

  • अँटी एजिंग: व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी नी परिपूर्ण असलेलं संत्र सौंदर्य खुलविण्यासाठी खूप उपयोगी आहे. अँटि एजिंग गुणासोबतच त्वचेवरील डाग दूर करण्याचा गुणही संत्र्यात आहे. संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन ए चं योग्य प्रमाण असल्यामुळे संत्री स्किन मेंब्रेन्सला पण हेल्दी ठेवतं.

 

  • डोळ्यांसाठी हेल्दी: संत्री डोळ्यांच्या म्यूकस मेंम्ब्रेन्सला सुद्धा हेल्दी ठेवतो. त्यामुळं मेक्यूलर डिजेनरेशनपासून डोळ्यांचा बचाव होतो. मॅक्यूलर डिजेनरेशन ही डोळ्यांशी संबंधित एक आजार आहे.

एकूणच संत्री हे आरोग्यासाठी खूप उत्तम आहेत. शिवाय यात फायबर्सचं प्रमाण अधिक असल्यानं ज्य़ांना वेट लॉस करायचं असेल त्यांनी संत्री खाणे उपयुक्त ठरेल. तसंच संत्र्यांमध्ये पाण्याचं प्रमाणही अधिक आहे. त्यामुळं उन्हाळ्यात संत्री खाणं शरिरासाठी उत्तम ठरतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Health benefits: वृद्धांनाही तरूण बनवणारा हा ज्यूस, पुरूषांसाठी आहे अमृतासमान Description: Health benefits for mens: संत्र खाल्यानं केवळ बिघडलेली तोंडाची चवच नाही सुधारत तर आरोग्याच्या दृष्टीनं संत्र खूप उपयुक्त आहे. फर्टिलिटी वाढवण्यासोबतच इतर काही आजारांना दूर पळविण्यासाठी संत्राचा उपयोग होतो.
Loading...
Loading...
Loading...