Health Benefits of eating Sprouted Onions in summer : ताजी फळे आणि ताज्या भाज्या खाण्याचे आरोग्याला लाभ होतात. पण अनेक भाज्यांमधून चव यावी म्हणून वापरला जाणारा कांदा तसेच कच्चा खाल्ला जाणारा कांदा आरोग्यासाठी लाभदायी आहे हे तुम्हाला माहिती आहे का? यातही मोड आलेले किंवा कोंब आलेले अर्थात अंकुरित कांदे खाल्ल्याने तब्येतीला खूप फायदा होतो हे माहिती आहे का?
तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य
अंकुरित कांद्यात व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉलेट, कॉपर असे शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत मोड आलेले अर्थात अंकुरित कांदे खाल्ल्यास आरोग्याला जास्त फायदा होतो.
दररोज मर्यादीत प्रमाणात मोड आलेले अर्थात अंकुरित कांदे खाल्ल्याने उष्माघातापासून संरक्षण होते तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते, अॅसिडिटी अर्थात पित्ताचा त्रास कमी होतो, पोटाची आग होण्याचे प्रमाण कमी होते.
अनेकदा घरातच कांद्याला काही दिवसांनी मोड येतात अर्थात कोंब येतात. यालाच अंकुरित कांदा म्हणतात. या व्यतिरिक्त कांदा घरातल्या मातीने भरलेल्या कुंडीत पेरला की दहा बारा दिवसांनी त्या कांद्यात मोड आलेले अर्थात कोंब आलेले दिसू लागतात. हा अंकुरित कांदा आरोग्यासाठी लाभदायी आहे.