Orange benefits in winter: हिवाळ्यात रोज खा एक संत्रे, त्वचा राहिल मऊ आणि मुलायम

आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी पोषक आहार घेण्याची गरज असते. खाण्यापिण्यात काही गोष्टींचा समावेश करून आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती अबाधित ठेवू शकतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणारा आणि थंडीच्या काळात आपल्या त्वचेची काळजी घेणारा पदार्थ म्हणजे संत्रे.

Orange benefits in winter
हिवाळ्यात संत्रे खाण्याचे फायदे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात संत्रे खाण्याचे अनेक फायदे
  • त्वचा होईल मऊ, मुलायम आणि तुकतुकीत
  • दात आणि हाडांचेही सुधारते आरोग्य

Orange benefits in winter: देशात अनेक भागात आता थंडीची (winter) चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. रात्रीच्या वेळी घराघरात सुरु असणारे पंखे आता बंद केले जात आहेत आणि उबदार पांघरुणं आणि स्वेटर कपाटातून बाहेर येऊ लागले आहेत. थंडीच्या काळात लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर (Immunity) परिणाम होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या काळात वेगवेगळ्या रोगांचं आक्रमण होण्याची शक्यता असते. आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी पोषक आहार घेण्याची गरज असते. खाण्यापिण्यात काही गोष्टींचा समावेश करून आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती अबाधित ठेवू शकतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणारा आणि थंडीच्या काळात आपल्या त्वचेची काळजी घेणारा पदार्थ म्हणजे संत्रे. संत्र्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात मिळतं. जाणून घेऊया, थंडीत संत्रे खाण्याने काय फायदे होतात, याविषयी. 

संत्र्याचे फायदे

१. संत्र्यामुळे आपली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं. त्यामुळे मलावरोधाच्या त्रासापासून दिलासा मिळतो आणि दररोज पोट साफ व्हायला मदत होते. पोट साफ न होण्याची समस्या असणाऱ्यांसाठी संत्रं हे वरदान मानलं जातं. पोटातील वाढत्या चरबीवरही संत्र्याचा रस गुणकारी ठरतो. संत्रं खाण्यामुुळे शरीरातील चरबी वेगाने कमी होऊ शकते. यात असणाऱ्या फायबरमुळे दीर्घकाळ पोट भरल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त खाण्यापासून आपली सुटका होते. वजन वाढण्याचे मूळ कारण हे प्रमाणापेक्षा जास्त खाणे, हेच असते. मात्र भूकेची भावनाच कमी झाल्याने अतिरिक्त खाण्याची इच्छा होत नाही आणि वजनवाढ टाळता येते.

अधिक वाचा - Pre Diabetic Symptoms: मधुमेह होण्यापूर्वी दिसतात ‘ही’ लक्षणं, वेळीच व्हा सावधान

२. संत्र्याचा परिणाम हृदयाशी संबंधित अनेक आजारांवर मात करण्यासाठीदेखील होत असतो. हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका संत्र्यामुळे कमी होतो. संत्र्यात असणारा प्लेवेनॉईड हा घटक हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असतो. संत्र्यात कॅल्शिअमदेखील मुबलक असतं. त्यामुळे दात आणि हाडं मजबूत व्हायला मदत होते आणि शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून निघते. 

. संत्रे खाल्ल्याने त्वचेचं आरोग्य सुधारण्यासही मदत होते. चेहऱ्यावरील डाग, फुटकुळ्या आणि इतर विकार दूर करण्यासाठी संत्र्याचा उपयोग होतो. संत्र्याच्या सालीचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा चमकदार आणि तुकतुकीत बनवू शकता. किडणीत जर खडा तयार होत असेल, तर संत्र्याच्या सेवनाने ही प्रक्रिया बंद व्हायला मदत होते. युरिनमध्ये सायट्रेटची पातळी वाढवण्याचं काम संत्रे करत असतं. 

अधिक वाचा - Loose weight for marriage: लग्नसराईत दिसा सडपातळ आणि फिट, ‘या’ उपायांनी वजन करा पटापट कमी

डिस्क्लेमर - सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या या काही सर्वसाधारण टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या अथवा प्रश्न असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी