Health Benefits of Neem Juice in Marathi : कडुनिंब अर्थात नीम. कडुनिंबात अनेक औषधी गुणधर्म आहेत. कांजण्या, गोवर, नागीण असे आजार झालेल्या व्यक्तीला कडुनिंबाची पाने गरम पाण्यात घालून त्या पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. कडुनिंबाची पाने पिण्यायोग्य पाण्याने धुवून नंतर चावून खाल्ल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. कडुनिंबाचा पालापाचोळा जाळून त्याची शेकोटी केली तर परिसरातले डास पळून जातात.
भारतीय संस्कृतीत कडुनिंबाला महत्त्व आहे. यामुळेच गुढी पाडवा या चैत्र महिन्यातील पहिल्या मोठ्या सणाच्या दिवशी कडुनिंबाची पाने चावून खाण्याची पद्धत आहेत. कडुनिंबाच्या पानांपासून तयार केलेली चटणी अर्थात कडुनिंबाची पाने आणि थोडं पाणी हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून त्याची झटपट तयार केलेली चटणी जेवताना घ्यावी. दररोज कडुनिंबाची थोडी चटणी खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. दररोज एक ग्लास कडुनिंबाचा ज्युस प्यायल्यास अनेक आजारांना दूर ठेवता येते. यासाठी कडुनिंबाची पाने आणि चटणीसाठी घेतात त्या तुलनेत जास्त पाणी हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. कडुनिंबाचा ज्युस पोटाच्या अनेक विकारांना दूर ठेवतो तसेच आजारी व्यक्तीला लवकर बरे करतो.
डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.