Ayurved for health: सूर्याची किरणं (Sun rays) हा नैसर्गिक ऊर्जेचा (Natural Energy) एक महान स्रोत (Source) मानला जातो. आयुर्वेदातही सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व असून सूर्यकिरणांचा योग्य प्रकारे उपयोग करून अनेक आजारांवर आणि विकारांवर मात करता येत असल्याचं सांगितलं जातं. भारतीय संस्कृतीत सूर्याला सर्वोच्च स्थान देण्यात आलं आहे, ते त्यामुळेच. पंचमहाभूतांपैकी सूर्य आणि पाणी ही दोन तत्त्वं योग्य प्रकारे एकत्र आली की शरीरातील विकारांना पळवून लावू शकतात, असं मानलं जातं. त्यासाठी सूर्यप्रकाशाने चार्ज केलेलं पाणी पिणं हे आरोग्यासाठी उत्तम मानण्यात येतं. आयुर्वेदात सांगितल्यानुसार जेव्हा सूर्याची किरणं पाण्यावर पडतात, तेव्हा पाण्याच्या मॉलिक्युलचं स्ट्रक्चर ‘बुस्ट’ होतं आणि त्यामुळे ‘डेड’ पाणी हे ‘लाईव्ह’ पाणी होतं.
आयुर्वेदानुसार शरीराला आतून हील करण्यासाठी सन चार्ज्ड वॉटरचा उपयोग होतो. शरीराचं इन्फेमेशन कमी करून ऊर्जा वाढवण्यासाठी सन चार्ज्ड वॉटरचा उपयोग होतो. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे या पाण्यातील अपायकारक जीवजंतू मरून जातात आणि शरीराला अनेक फायदे होतात.
सच चार्ज्ड वॉटरमुळे शरीराचा अग्नी सुधारत असल्याचं आयुर्वेद सांगतो. सूर्यकिरणांनी चार्ज केलेल्या पाण्यामुळे शरीराची डायजेस्टिव्ह फायर वाढायला मदत होते, भूक वाढते आणि पचनाशी संबंधित विकार बरे होतात. जर तुमच्या पोटात काही विकार असतील, ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा अल्सर असेल तर त्याच्यावर हे पाणी फारच गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.
अधिक वाचा - Reverse Dieting : रिव्हर्स डायटिंग म्हणजे काय? वाढलेले वजन कसे नियंत्रित करते?
या पाण्याच्या वापरामुळे त्वचेचं आरोग्य सुधारणे, त्वचा अधिक चमकदार आणि सतेज होणे यासारखे फायदे होतात. अनेकांना त्वचेच्या ॲलर्जीचा त्रास असतो. या पाण्याने तो त्रासही कमी होतो.
सन चार्ज्ड वॉटर तयार करण्यासाठी एका काचेच्या बाटलीत पाणी भरावं. ही बाटली कमीत कमी 8 तास सूर्यप्रकाशात ठेऊन द्यावी. वास्तविक सलग तीन दिवस 8 तास जर ही बाटली सूर्यप्रकाशात ठेवली, तर त्याचा सर्वाधिक फायदा होत असल्याचं सांगितलं जातं. हे पाणी फ्रीजमध्ये ठेऊ नये. पाणी चार्ज केल्यानंतर दिवसभर थोडं थोडं पित राहण्याचा सल्ला दिला जातो. पाणी भरण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या बाटल्यांचा वेगवेगळा उपयोग आणि परिणाम होत असल्याचं सांगितलं जातं. त्याला क्रोमाथेरपी असंही म्हटलं जातं. सामान्यतः दैनंदिन वापरासाठी कुठल्याही विशिष्ट रंगाची बाटली न वापरता ट्रान्स्परन्ट रंगाची बाटली वापरण्याचा सल्ला दिला जातो.
अधिक वाचा - Coriander Leaves Benefits: कोथिंबीर आरोग्यासाठी खूप चांगली आहे, कोथिंबीरीमुळे शरिराचे 5 फायदे होतात
आयुर्वेदात पंचमहाभूतांचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. त्यापैकी सूर्य आणि पाणी ही दोन तत्त्वं आहेत. शरीरात प्रत्येक घटक योग्य प्रमाणात असणं हे आरोग्याचं लक्षण मानलं जातं. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होणं हे तब्येतीसाठी नुकसानकारक मानलं जातं. त्यामुळे निसर्गातील सर्व घटक योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे शरीरापर्यंत पोहोचवण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.