तुम्हाला बोटे मोडण्याची सवय आहे का? शरीरासाठी वाईट आहे ही सवय...

तब्येत पाणी
Updated May 06, 2019 | 20:55 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

वारंवार बोटे मोडण्याची सवय असेल तर ही सवय तुम्हाला गंभीर आजाराचे शिकार बनवू शकते. ही सवय तुमच्या बोटांचा आकार बिघडण्यास कारणीभूत ठरतेच मात्र यासोबतच सांधेदुखीसाठीही कारण ठरू शकते.

fingers
बोटे  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: अनेक लोकांना तुम्ही पाहिले असेल की बोटे मोडण्याची सतत सवय असते. अनेकदा घाबरल्याने अथवा कंटाळा आल्यास बोटे मोडत असल्याचे अनेकांना तुम्ही पाहिले असेल. लहान मुलेही मोठ्यांना असे करताना पाहून स्वत: करू लागतात. एक दोनदा ठीक आहे मात्र वारंवार तुम्ही असे करत राहिलात तर ती सवय होऊन जाते. त्यामुळे जर एखाद्या दिवशी बोटे मोडली नाहीत तर बोटे जड झाल्यासारखी वाटू लागतात. तुम्हालाही ही सवय आहे का? ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अतिशय वाईट आहे. या सवयीमुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास सतावू शकतो. 

या कारणामुळे बोटे दुखतात

शरीरातील प्रत्येक दोन हाडांच्या मध्ये एक लिक्विड असते. ज्यामुळे हाडांची हालचाल होण्यास मदत होते. हे लिक्विड म्हणजे सायनोव्हायल फ्लुईड असते. हे लिक्विड हाडांना एक प्रकारचे ग्रीसिंग करण्याचे काम करते मात्र जेव्हा बोटे मोडली जातात तेव्हा हे लिगामेंट कमी होत जाते आणि हाडे एकमेकांशी रगडू लागतात. यामुळे हाडांमध्ये कार्बन डायऑक्साईड भरण्यास सुरूवात होते तसेच हळू हळू सांध्यांमध्ये त्रास सुरू होते. हेच कारण आर्थरायटिससाठी कारणीभूत ठरू शकते. 

सतत बोटे मोडल्याने गाठ होण्याची शक्यता

वारंवार बोटे मोडल्याने बोटांमध्ये ताण येतो. यामुळे हाडांना जोडणारे लिगामेंटचे सिक्रेशन कमी होऊ लागते. यामुळे हाडे एकमेकांशी रगडू लागतात. याचा परिणाम म्हणजे आर्थरायटिसचे तुम्ही शिकार होऊ शकता. 

बोटांच्या सांध्यांना सूज येते

सतत बोटे मोडल्याने बोटांच्या सांध्यांना सूज येते. वारंवार तुम्ही हे करत असाल तर ही सूज अधिकच वाढते. त्यामुळे बोटांना स्पर्श केल्यासही बोटे दुखू लागतात. पेशींना सूज येते. 

अशी सोडा सवय

  1. स्वत:ला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमचे हात फ्री असतील तेव्हा बोटे मोडण्याच्या सवयीने तुम्ही ते करू लागाल. त्यामुळे स्वत:ला सतत बिझी ठेवा. 
  2. जेव्हा बोटे मोडण्यासाठी तुमचे हात पुढे येथील तेव्हा हातात एखादी वस्तू घ्या. यामुळे तुमची ही सवय कमी होईल. 
  3. एक आठवडा तुम्ही बोटे मोडली नाहीत तसेच हे करण्यापासून स्वत:ला रोखले तर तुमची ही सवय सुटू शकते. काही उपाय आणि इच्छा शक्तीच्या आधारे तुम्ही बोटे मोडण्यासारख्या सवयीपासून सुटका मिळवू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी