नवी दिल्ली: (Anjir)Fig Benefits For Health: आजकाल प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली (lifestyle) खूपच धकाधकीची झाली आहे. वाढत वजन (Increasing weight) त्यात एक समस्या बनून जाते. योग्य आहार न मिळणं मुख्य कारण ठरतं. अशावेळी अशा काही गोष्टी आहेत ज्या खाल्ल्यावर आरोग्यासंदर्भातल्या समस्या कमी होतात. अंजीर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित खाल्ल्यानं शरीरातील आयरनची कमतरता दूर करता येते. याशिवाय तुमच्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. एवढंच नाही तर पुरुष आणि महिलांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही अंजीर खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अंजीरचे शरीरासाठी किती फायदे (benefits of figs) आहेत ते सांगणार आहोत.
वजन कमी करण्यात मदत
अंजीरमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे विशेषत: वजन नियंत्रणात करू इच्छिणांऱ्यासाठी एक बेस्ट नाश्ता किंवा मध्यरात्रीचा आहार होऊ शकतो. सुके अंजीर खाणं हा उत्तम पौष्टिक नाश्ता मानला जातो. 2 किंवा 3 सुके अंजीरांमुळे तुम्हाला बराच वेळासाठी पोट भरल्यासारखे वाटू शकतं आणि ते तुमच्या दोन वेळेच्या जेवणामध्ये जास्त अंतर राखण्यास मदत करू शकते.
अधिक वाचा- स्वातंत्र्यदिनी बनवा टेस्टी तिरंगी ढोकळा, जाणून घ्या सोपी रेसिपी
रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत
फास्ट फूडचे सेवन दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याचीही शक्यता जास्त आहे. उच्च रक्तदाबामुळे तुमच्या शरीरात पोटॅशियमचे प्रमाण कमी होतं. अंजीर पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे, जे नैसर्गिकरित्या पोटॅशियमची पातळी सुधारू शकते. अशावेळी अंजीर हे रक्तदाब नियंत्रित करू शकते.
पचनक्रियाही सुधारते
अंजीर हे प्रीबायोटिक्सचा उत्तम स्रोत आहे. यामुळे पचन प्रक्रिया आणि एकूण आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात. अंजीर हे फायबर समृद्ध असल्यानं स्टूलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, ज्यामुळे सामान्य आतड्याची हालचाल ही होते.
अंजीर प्रजननासाठी फायदेशीर
प्राचीन ग्रीक काळापासून अंजीर हे लव्ह फ्रूट्स म्हणून ओळखले जात होते. नंतर त्यावर संशोधन करण्यात आले आणि त्यात आयरनचे प्रमाण जास्त असल्याचं सिद्ध झालं. स्त्रियांमध्ये ओव्हुलेशनच्या संपूर्ण प्रक्रियेत आयरनची भूमिका महत्त्वाची असते. पुरुषांसाठी, कमी आयरन शुक्राणूंची गुणवत्ता आणि गतिशीलता प्रभावित करू शकते. पुनरुत्पादक आरोग्याला चालना देण्यासाठी अंजीर दुधासोबत खाल्ले जातात.