Health News: दररोज दोन घोट प्या आवळ्याचा ज्यूस, आणि मग बघा आरोग्यावर होणारे एकापेक्षा एक चांगले परिणाम

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Sep 04, 2022 | 16:50 IST

Drink Amla Juice For Good Health: आवळ्याचा रस रोज प्यायल्याने त्वचेवर चमक येऊ शकते. याशिवाय केसांच्या समस्या, अपचन आणि वजन कमी करण्यात मदत होते.

Amla Juice Benefits
आवळ्याचा ज्यूस पिण्याचे फायदे 
थोडं पण कामाचं
  • आवळ्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. आवळ्यात व्हिटॅमिन सी आढळून येते.
  • आवळ्याच्या सेवनाने तुमचे केस मजबूत होतात. त्यासोबतच त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
  • आवळ्यात फायबर, आयरन, जस्त, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स (fiber, iron, zinc, vitamin B complex, calcium, antioxidants) यासारखे पोषक तत्त्वं असतात.

मुंबई: Amla Juice Benefits For body: आज आम्ही तुम्हाला आवळ्याच्या ज्यूसचं दररोज सेवन केल्यानं (Health Benefits)  आरोग्यावर किती फायदे होतात याबद्दल सांगणार आहोत. आपल्या आरोग्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. आवळ्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. आवळ्यात व्हिटॅमिन सी आढळून येते. म्हणून आवळा  हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. याच्या सेवनाने तुमचे केस मजबूत होतात. त्यासोबतच त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय आवळ्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. आवळ्यात फायबर, आयरन, जस्त, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स (fiber, iron, zinc, vitamin B complex, calcium, antioxidants) यासारखे पोषक तत्त्वं असतात. हे पोषक तत्त्वं जे अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवू शकतात. याशिवाय आवळ्याचा ज्यूस अनेक समस्यांवर मात करू शकतो. आवळा ज्यूसचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. (Health News in marathi Drink 2 sips of amla juice daily Benefits For body)

आवळ्याच्या ज्यूसचे आरोग्यादायी फायदे

वजन कमी करण्यास होते मदत 

आवळ्याचा ज्यूस नियमित प्यायल्याने शरीराचे वजन कमी होऊ शकते. हे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करते, ज्यामुळे तुम्हाला बरेच फायदे मिळतील. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे फॅट वेगानं बर्न होतो. 

अधिक वाचा-  बिहारच्या पंकज त्रिपाठी यांना काय आवडते खायला, जाणून घ्या त्यांच्या  Lifestyle बद्दल

रक्त स्वच्छ करते

आवळ्याचा ज्यूस अँटिऑक्सिडंट गुणधर्माने समृद्ध आहे. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते, जे रक्त स्वच्छ करण्यासाठी प्रभावी आहे.

स्कीनसाठी हेल्दी

आवळ्याचा ज्यूस नियमित प्यायल्याने स्कीनशी संबंधित समस्या दूर होतात. यामुळे स्कीनवरील मुरुम आणि डागांच्या समस्या कमी होऊ शकतात. यासाठी आवळ्याचा ज्यूस नियमित प्या. याशिवाय तुम्ही त्याचा ज्यूस थेट स्कीनवर लावू शकता.

बद्धकोष्ठतेपासून मिळतो आराम

आवळ्याचा ज्यूस बद्धकोष्ठता, पोटदुखी, अपचन आणि गॅसच्या समस्या दूर करू शकतो. यामुळे पोटात जळजळ आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो. विशेषत: तुमच्या पोटात जंत असल्यास त्याचे सेवन करा.

डोळ्यांची दृष्टी

आवळ्याचा ज्यूस डोळ्यांची दृष्टी सुधारतो. याच्या मदतीने डोळ्यात पाणी येणे, खाज येणे आणि जळजळ होण्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी आवळ्याचा ज्यूस नियमित प्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी