Tips For Good Health | मुंबई : वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात. सप्लिमेंट्स आणि फॅट बर्नर सारख्या गोष्टींवर पैसे वाया घालवतात, ज्यामुळे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. तर पोषणतज्ञ सोप्या आणि जलद मार्गाने वजन कमी करण्याचे नैसर्गिक मार्ग सांगतात. तज्ञांनी अशा अनेक नैसर्गिक गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्यांच्या कॉम्बिनेशनमुळे वजन दुप्पट वेगाने कमी होऊ शकते. ज्यांना पोट वाढण्याची तक्रार आहे त्यांच्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. (Health Tips A combination of these 10 things destroy body fat).
अधिक वाचा : या तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी हा आठवडा असणार खास
ओटमील आणि अक्रोडाचे मिश्रण शरीराला संतुलित पोषण देते. ओटमीलला फायबरचा मुख्य स्त्रोत मानले जाते, तर अक्रोडमध्ये फायबरसह चरबी आणि प्रथिने चांगली असतात. वजन व्यवस्थापनासाठी हे खूप चांगले कॉम्बिनेशन मानले जाते.
पीनट बटरसोबत केळी खाल्ल्याने आपल्या शरीराल भरपूर पोषक द्रव्ये मिळतात. यांना चांगले कार्ब्स, हेल्दी फॅट आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानले जाते. ज्यांना झपाट्याने वजन कमी करायचे आहे त्यांनी हे कॉम्बिनेशन एकदा नक्की करून पाहावे.
अधिक वाचा : तब्बल एवढ्या संपत्तीचा मालक आहे ईशान किशन
तज्ञांच्या अभ्यासात असे सिध्द झाले आहे की, दही वजन कमी करण्यासाठी खूप फलदायी आहे. कारण त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन-डी, प्रोटीन आणि अमिनो आम्लाचे कॉम्बिनेशन असते. जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या बेरीसह दही खाल्ल्याने वजन कमी करण्याचा वेग झपाट्याने वाढतो.
प्रथिनांचा राजा असलेले अंडे आपले चयापचय वाढवण्याचे काम करते. व्हिटॅमिन-सी युक्त शिमला मिरची असलेली अंडी खाल्ल्याने आपल्याला सारखी भूक लागत नाही. याशिवाय शरीरात साठलेली चरबीही झपाट्याने कमी होते.
अधिक वाचा : महाराष्ट्राची मास्क, सोशल डिस्टन्सिंग पासून सुटका?
डाळी हा प्रथिनांचा खूप चांगला स्त्रोत आहे. तर भातामध्ये असलेले कार्ब्समधून आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. लक्षणीय बाब म्हणजे वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी या दोन्हींचे कॉम्बिनेशन खूप चांगले मानले जाते.
हिरव्या पालेभाज्यांना जीवनसत्त्वे आणि खनिजांचा खूप चांगला स्रोत मानल्या जातात. त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. तर एवोकॅडोमध्ये चांगली चरबी असते ज्यामुळे तुमची भूक बराच काळ शमते. त्यांच्या कॉम्बिनेशनमुळे वजन झपाट्याने कमी होतेच, पण ते तुमच्या आरोग्यासाठीही खूप चांगले असते.
डार्क चॉकलेटमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी आम्ल असतात, जे चयापचय वाढवतात तसेच कॅलरी बर्न करतात. तसेच पोषक तत्वांनी समृद्ध बदाम अनावश्यक भूक दूर ठेवण्याचे काम करतात. या दोन गोष्टींचे कॉम्बिनेशन जलद वजन कमी करण्यात प्रभावी आहे.