पुरुषांची सेक्स पॉवर वाढविणारी पानं

health tips, benefits of arbi leaves, increase male sex power : अर्बीची पानं म्हणजेच अळुची पानं. अळुच्या पानांमध्ये पुरुषांची सेक्स पॉवर वाढविण्याची प्रचंड क्षमता आहे

health tips, benefits of arbi leaves, increase male sex power
पुरुषांची सेक्स पॉवर वाढविणारी पानं  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पुरुषांची सेक्स पॉवर वाढविणारी पानं
  • अळुच्या पानांमध्ये पुरुषांची सेक्स पॉवर वाढविण्याची प्रचंड क्षमता आहे
  • कशी खावी अळुची पानं?

health tips, benefits of arbi leaves, increase male sex power : अर्बीची पानं म्हणजेच अळुची पानं. महाराष्ट्रात अळुची वडी, अळुची भाजी हे पदार्थ माहिती असलेले अनेकजण आढळतील. पण याच अळुच्या पानांमध्ये पुरुषांची सेक्स पॉवर वाढविण्याची प्रचंड क्षमता आहे हे किती जणांना माहिती आहे... 

अळुची पानं व्यवस्थित चावून खाल्ल्यास पुरुषांच्या सेक्स पॉवरमध्ये वाढ होण्यास मोठी मदत होते. या पानांमध्ये असे पोषक घटक असतात जे पुरुषांची सेक्स पॉवर वाढविण्यास मदत करतात. 

नियमित अळुची पानं चावून खाल्ल्यास पुरुषांची सेक्स पॉवर वाढते तसेच त्यांच्यातील इतर लैंगिक समस्या दूर होण्यास मदत होते. ही पानं पुरुषांमधील वीर्याचे प्रमाण आणि वीर्याची गुणवत्ता दोन्हीत वाढ करतात. यामुळेच अळुची पानं पुरुषांसाठी लाभदायी आहेत. 

  1. कशी खावी अळुची पानं? : अळुची पानं स्वच्छ धुवून नंतर पाण्यात ठेवून उकळवून घ्यावी. नंतर चवीपुरत्या मिठासोबत ही पानं चावून खाल्ल्यास फायदा होतो.
  2. अळुची पानं खाल्ल्यास होतो डोळ्यांना फायदा : अळुच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए असते. यामुळे ही पानं खाल्ल्यास डोळ्यांना फायदा होतो. 
  3. अळुची पानं खाल्ल्यास गुडघेदुखी होते बरी : नियमित मर्यादीत प्रमाणात अळुची पानं खाल्ल्यास गुडघेदुखी बरी होण्यास मदत होते. 
  4. अळुची पानं खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत होते : नियमित मर्यादीत प्रमाणात अळुची पानं खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत होते. तणावामुळे होणारा त्रास कमी होऊ लागतो.
  5. अळुची पानं खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते : दररोज मर्यादीत प्रमाणात अळुची पानं खाल्ली तर वजन कमी होण्यास मदत होईल. या पानांतील फायबर पचनक्षमता सुधारते. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्यास अळुचे सेवन लाभदायी ठरते. 
  6. अळुची पानं खाल्ल्यास पोटाचे विकार दूर होण्यास मदत होईल : नियमित मर्यादीत प्रमाणात अळुची पानं खाल्ल्यास पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. अळुची पानं साध्या पाण्यात ठेवून ते पाणी आणि पानं उकळवून नंतर पाण्यात तूप टाकतात. यानंतर हे पाणी दिवसातून दोन वेळा अशा पद्धतीने पुढील तीन दिवस पितात. यामुळेही पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी