Betel Leaves Health Benefits: जेवणानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे पान खायला आवडते? गोड पान, साधे पान किंवा मसाला पान? हौस म्हणून सुपारी खाण्याऐवजी हे पान खाण्याची आवड तुम्ही जोपासू शकता. आश्चर्यचकित होऊ नका, आम्ही कोणत्याही व्यसनाचा बळी होण्याचा सल्ला देत नाही. उलट, हा सल्ला फॉलो करून तुम्हाला काही आजारांपासूनही आराम मिळू शकतो. एका छोट्या हिरव्या पानात आरोग्याचे असंख्य फायदे दडलेले आहेत. (Health Tips betel leaf 5 health benefits)
तुमच्या पचनाशी निगडीत असलेल्या तक्रारींना तुम्ही अनेकदा बळी पडतात, जसे की बद्धकोष्ठता किंवा जास्त ऍसिडिटी. त्यामुळे पान तुमच्यासाठी औषध ठरू शकते. हे पान रोज सकाळी रिकाम्या पोटी चघळण्याची सवय लावा. या सरावामुळे तुमची पचनक्रिया सुधारू शकते.
अधिक वाचा: Hair fall problem : हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवते केस गळतीची समस्या
तुम्ही हिरड्यांच्या कोणत्याही समस्येने झगडत असाल तर पानामुळे आराम मिळू शकतो. सुजलेल्या हिरड्या आणि त्यातून होणारा त्रास कमी करण्यासाठी सुपारीचे पान खा.
सुपारी पानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी मेटेंन ठेवते. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी रोज सुपारीचे पान चघळल्याने आराम मिळतो.
अधिक वाचा: Vitamin B Veg Foods: मासांहार न करता 'या' व्हेज फूडमधून मिळेल व्हिटॅमिन बी
सुपारीची पाने काथ किंवा चुना मिसळून खाल्ल्यास दातांना इजा होते. त्याशिवाय फक्त साधे पान खाणे दातांसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही ही पाने बारीक करून त्यात लिंबू मिसळून खावू शकता.
अधिक वाचा: Face Cleanser: चेहरा होईल चमकदार, सुरकुत्याही होतील नाहीशा; वापरा हे नैसर्गिक फेस क्लिंजर
सुपारीच्या पानांमध्ये काही प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात. म्हणूनच ही पाने किरकोळ संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रभावी आहेत. सुपारीची पाने मधात मिसळून किंवा बारीक करून खाल्ल्यास सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
टिप- या लेखात दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ही स्वीकारण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांता सल्ला घेणे आवश्यक आहे.