weight loss tips : अळशी खा झटपट वजन कमी करा

health tips, eat flax seeds for weight loss : आळशी चावून चावून खाल्ली तर झटपट वजन कमी करता येईल. दररोज एक किंवा दोन चमचे अळशी चावून खाल्ल्यास वजन कमी करण्यास मोलाची मदत होईल.

health tips, eat flax seeds for weight loss
weight loss tips : अळशी खा झटपट वजन कमी करा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • weight loss tips : अळशी खा झटपट वजन कमी करा
  • आळशी चावून चावून खाल्ली तर झटपट वजन कमी करता येईल
  • दररोज एक किंवा दोन चमचे अळशी चावून खाल्ल्यास वजन कमी करण्यास मोलाची मदत होईल

health tips, eat flax seeds for weight loss : फास्टफूड आणि जंकफूडच्या काळात लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या झाली आहे. पण वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना इन्स्टंट पर्याय हवे असतात. अशा इस्टंटच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी. आळशी चावून चावून खाल्ली तर झटपट वजन कमी करता येईल. दररोज एक किंवा दोन चमचे अळशी चावून खाल्ल्यास वजन कमी करण्यास मोलाची मदत होईल.

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर, लिग्नान, प्रोटिन (प्रथिने), थायमीन, सायनोजेनिक ग्लाइकोसाइड, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फाइटोस्टेरॉल असते. हे घटक वजन कमी करण्यास मदत करतात. यामुळे दररोज एक किंवा दोन चमचे अळशी (अळशीच्या बिया) चावून खाणे लाभदायी आहे.

लवकर वजन कमी करण्यासाठी एक ग्लास पाणी उकळवून घ्या. या एर ग्लास पाण्यात एक चमचा अळशी टाका. आता हे उकळवलेले पाणी सावकाश प्या आणि पाण्यात टाकलेल्या अळशीच्या बिया चावून खा. यामुळे आधी खाल्लेले पदार्थ व्यवस्थित पचण्यास मदत होईल. तसेच वजन कमी होण्यास मदत होईल.

ज्यांना अळशीच्या बिया चावून खाणे त्रासदायक वाटते ते बिया कुटून त्यांची पूड (पावडर) करून ती पाण्यात घालून घेऊ शकतात. अळशीच्या बिया अथवा अळशीची पूड हवाबंद डब्यात दीर्घकाळ टिकून राहते. यामुळे पुढचे अनेक दिवस अळशीचा वापर करणे सोपे होते. 

वजन कमी करण्याव्यतिरिक्त अळशी बॅड कोलेस्ट्रोल कमी करण्यास, उच्च रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात आणण्यास, कॅन्सर आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी