नवी दिल्ली: जांभूळ (Jamun) हे फळ एक स्वादिष्ट उन्हाळी फळ आहे. जांभूळ हे फळ आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. लहानपणी जांभूळ खाण्याच्या अनेक चांगल्या आठवणी आहेत. मात्र आता जांभूळ खाण्याचे काय फायदे आहेत ते समजण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यतः पुरुषांसाठी जांभूळ (Java Plum) खाण्याचे अनेक फायदे आहेत. पुरुषांनी जर जांभूळ खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. यासोबतच त्वचाही चांगली होते. चला जाणून घेऊया, पुरुषांच्या आरोग्यासाठी जांभूळ खाण्याचे काय काय फायदे आहेत.
जांभूळ खाल्ल्यानं पुरुषांच्या आरोग्यावर होणारे फायदे
हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव
जांभळाचं सेवन केल्यास हिरड्यांमधून (Gum Bleeding)रक्त येण्याची समस्या दूर होते. जांभळात अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे हिरड्यांमधून रक्त येणं थांबतं. इतकंच काय तर तुम्हाला हवं असल्यास जांभळाची पानं बारिक करुन त्याची पावडर तयार करावी. ती पावडर दात स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.
वजन कमी करण्यासही होते मदत
वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जांभूळ हे एक उत्तम फळ आहे. जांभळात मोठ्या प्रमाणात फायबर असतं आणि तर कॅलरीज कमी असतात. त्यामुळे हे फळ वजन कमी करण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे त्यात पाण्याचं प्रमाणही जास्त असते आणि फॅटचंही प्रमाण कमी असते.
ब्लड प्रेशरसाठी फायदेशीर
जांभळात पोटॅशियमचे प्रमाण चांगलं असतं. ज्यामुळे जांभूळ हाय ब्लड प्रेशरचा धोका दूर ठेवते. ब्लड प्रेशरचा (Blood Pressure) त्रास असलेले पुरुष जांभूळ खाऊ शकतात.
स्किन निरोगी राहते
जांभूळ खाण्याचा त्वचेसाठीही खूप फायदा होतो. जांभूळ त्वचेपासून मुरुम, (Acne) सुरकुत्या आणि पुरळ दूर ठेवते. पुरुष अनेकदा त्यांच्या त्वचेची काळजी गांभीर्याने घेत नाहीत, त्यामुळे जांभूळ खाणं हा एक चांगला पर्याय आहे. जांभूळमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे त्वचेला टवटवीत ठेवण्यास मदत करते.