महिलांसाठी खास बातमी.. मासिक पाळी लवकर येण्यासाठी करा 'हे' घरगुती 5 सोपे उपाय

प्रत्येक मुलगी किंवा महिला विचार करते की या कार्यक्रमांच्या आधी किंवा टूरच्या आधी मासिक पाळी येऊन गेल्यास मोठं टेन्शन जाईल. हेच टेन्शन आज आम्ही दूर करणार आहोत.

Periods calendar
periods get early  |  फोटो सौजन्य: Shutterstock
थोडं पण कामाचं
  • तुम्ही तुमची मासिक पाळी लवकर आणू शकता आणि ते देखील सुरक्षितरित्या.
  • मग जाणून घेऊया मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय
  • हेच टेन्शन आज आम्ही दूर करणार आहोत.

नवी दिल्ली: कोणत्याही कार्यक्रमाला किंवा पार्टीला जाण्यापूर्वी महिलांना नेहमी मासिक पाळीतून मोकळं व्हावं असं वाटत असतं. किंवा कधी कधी अचानक एखाद्या धार्मिक कार्यक्रमात महिलांना सहभागी व्हायचं असतं. मात्र तेव्हाही टेन्शन येते. कारण त्या काळात पोटदुखी किंवा इतर समस्यांचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे या समस्यांशी झुंजणाऱ्या अनेक महिला अस्वस्थ राहतात. मासिक पाळीमुळे महिलांना कार्यक्रमाचा पूर्ण मनसोक्त आनंद घेता येत नसतो, त्यामुळे त्यावेळी तिचं मन उदास राहते. तसचं कधी कधी संपूर्ण कुटुंब टूरवर असतात आणि त्यावेळी इच्छा असूनही त्या क्षणाचा आनंद घेता येत नाही. म्हणून या परिस्थितीत प्रत्येक मुलगी किंवा महिला विचार करते की या कार्यक्रमांच्या आधी किंवा टूरच्या आधी मासिक पाळी येऊन गेल्यास मोठं टेन्शन जाईल. हेच टेन्शन आज आम्ही दूर करणार आहोत. 

तुमच्यासाठी आमच्याकडे एक चांगली बातमी आहे. होय! हे शक्य आहे, असे अनेक नैसर्गिक उपाय आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमची मासिक पाळी लवकर आणू शकता आणि ते देखील सुरक्षितरित्या. 

मग जाणून घेऊया मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय 

ओवा ठरतो खूप प्रभावी 

ओवा आणि गूळ यांचं मिश्रण हे मासिक पाळीच्या क्रॅम्पपासून मुक्त करतं. तसंच मासिक पाळी लवकर येण्यासही हे मिश्रण मदत करते. केवळ एक चमचा ओवा आणि 1 चमचा गूळ एका ग्लास पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. 

उपाशी पोटी खा आलं 

आलं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आल्याची चहा सर्वात शक्तिशाली एमेनागॉग्सपैकी एक आहे. ज्यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते. असं म्हटलं जातं की, आलं गर्भाशयाभोवती उष्णता वाढवतं, ज्यामुळे आकुंचन होण्यास मदत होते. आल्याचं सेवन चहामध्ये किंवा ताज्या आल्याचा रस मधात मिसळून करु शकता. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी आल्याचं सेवन करा. 

पपईही आहे फायदेशीर 

कच्चा पपई गर्भाशयातील संकुचनला उत्तेजित करतो आणि मासिक पाळीला प्रेरित करण्यास मदत करतो. पपईमध्ये उपस्थित कॅरोटीन एस्ट्रोजन हार्मोनला उत्तेजित करतो, ज्यामुळे मासिक पाळी लवकर येते. पपई दिवसातून दोन वेळा खावं.

बडीशेपचे खाण्याचे फायदे

बडीशेपचे नियमित रिकाम्या पोटी सेवन करावं. ज्यामुळे मासिक पाळी नियमित होते आणि लवकर येते. एका ग्लास पाण्यात 2 चमचे बडीशेप मिसळा आणि रात्रभर तशीच ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून प्या.

मेथीच्या दाण्यांचा असा करा वापर 

मासिक पाळी येण्यासाठी मेथी आणि मेथीचे दाणे खूप फायदेशीर ठरतात. मेथी ही उष्ण असल्यानं त्याचा प्रभावही पटकन होणारा आहे. मेथीचे दाणे पाण्यात उकळून प्या. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी