Health Tips: अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे 'हे' पाणी, आजपासूनच सुरू करा प्यायला

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Sep 23, 2022 | 16:12 IST

Health Advice: जेव्हा प्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हा सर्दी (cold), खोकला (cough) आणि फ्लू (Fever) होण्याचा धोका वाढतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

Water Benefits
अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे 'हे' पाणी, जाणून घ्या 
थोडं पण कामाचं
  • जेव्हा प्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हा सर्दी (cold), खोकला (cough) आणि फ्लू (Fever) होण्याचा धोका वाढतो.
  • दालचिनी, लवंग, बडीशेप, ओवा आणि काळी मिरी यांसारखे मसाले भारतीय जेवणाला चवदार बनवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
  • या मसाल्यांचे पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात.

मुंबई: Water Benefits: आजकालच्या सततच्या बदलत्या वातावरणामुळे आजारांमध्ये (Diseases) वाढ होत चालली आहे. त्यात ताप, सर्दी, खोकला हे आजार मुख्य आहेत. पावसाळ्यात (Rainy season)  त्याचा प्रसार झपाट्याने होतो. जेव्हा प्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हा सर्दी (cold), खोकला (cough)  आणि फ्लू (Fever) होण्याचा धोका वाढतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. त्यात दालचिनी, लवंग, बडीशेप,  ओवा आणि काळी मिरी यांसारखे मसाले भारतीय जेवणाला चवदार बनवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या मसाल्यांचे पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात. 

आज आम्ही तुम्हाला या मसाल्यापासून बनवलेल्या पाण्याचे अनेक फायदे सांगणार आहोत, हे जाणून तुम्हालाही ते वापरून पहावेसे वाटेल. यात आपण प्रथम ओवा आणि बडीशेप बद्दल बोलणार आहोत. हे दोन्ही मसाले आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. याचा रोज वापर केल्यास किरकोळ समस्यांवर औषध घ्यावे लागणार नाही.

अधिक वाचा-  चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी नक्की ट्राय करा  बीटचा ‘हा’ फेसपॅक

त्वचेसाठी फायदेशीर
 
ओवा आणि बडीशेप, हे दोन्ही मसाले त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. ओवा आणि बडीशेपचे पाणी प्यायल्याने त्वचेला चमक येते. ओवा आणि बडीशेप पाणी आपली त्वचा डिटॉक्स करते आणि त्वचेला मुरुमांपासून दूर ठेवते.
 
सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी घरगुती कृती

बडीशेप आणि ओवा पाणी सर्दी आणि फ्लूसारख्या पावसाळ्यातल्या संसर्गापासूनमुक्त होण्यासाठी प्रभावी आहे. हे पाणी प्यायल्याने घसा दुखणं आणि खोकल्यापासून आराम मिळतो.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते

बडीशेप आणि ओव्याचे पाणी देखील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. या पाण्यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात, जे वाढते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
 
पोटाच्या समस्येपासून सुटका मिळेल

बडीशेप आणि ओव्याचे पाणी तुमची पचनक्रिया मजबूत करते. यासोबतच हे पाणी प्यायल्याने गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा अनेक समस्या दूर होतात.

अधिक वाचा-  उत्तराखंडमधल्या 'या' जागेला एकदा तरी भेट द्या, दिसेल स्वर्ग 

मॉर्निंग सिकनेस साठीही फायदेशीर

मॉर्निंग सिकनेसमुळे उलट्या, मळमळ किंवा अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवतात. बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्यायल्याने मॉर्निंग सिकनेसची समस्या दूर होते. तसेच तुम्हाला फ्रेश वाटते.
 
ओवा आणि बडीशेपचे पाणी अशा प्रकारे वापरा

बडीशेप आणि ओव्याची पावडर बनवा आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत सेवन करा. याशिवाय ओवा आणि बडीशेप यांचे पाणी भाजी किंवा डाळीत वापरता येऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी