Weight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल देखील करते वजन कमी, केवळ असे करा सेवन

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Nov 09, 2022 | 09:42 IST

Lemon Peels For Weight Loss: लिंबू वजन कमी करण्यासाठी ओळखले जाते. फक्त लिंबूच नाही तर त्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊया.

Weight Loss
फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल देखील करते वजन कमी, केवळ असे करा सेवन 
थोडं पण कामाचं
  • वजन कमी (weight loss) करण्यासाठी लिंबू (Lemon) खूप प्रभावी मानले जाते. ल
  • लिंबाच्या सालीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात.
  • याशिवाय लिंबाच्या सालीमध्ये D-limonene नावाचे तत्व असते जे चरबी कमी करण्यास मदत करते.

मुंबई:  Lemon Peels To Lose Fat: वजन कमी (weight loss) करण्यासाठी लिंबू (Lemon)  खूप प्रभावी मानले जाते. लिंबू आपण सगळेच वापरतो, पण त्याची साल काढून फेकून देतो. लिंबाच्या सालीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात. याशिवाय लिंबाच्या सालीमध्ये D-limonene नावाचे तत्व असते जे चरबी कमी करण्यास मदत करते. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर कसा करू शकतो हे सांगणार आहोत. फक्त वजन कमी करत नाही तर लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने इतरही अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकले जातात

लिंबाच्या सालीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आढळतात जे तणाव कमी करण्यास मदत करतात. जर तुम्ही तणावाखाली असाल तर तुम्ही लिंबाची साल खाऊ शकता. शरीरात चरबी वाढली की त्यामुळे विषारी पदार्थही वाढतात. लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी फॅट बर्न करण्यास मदत करते.

अधिक वाचा-  कापूर-लवंगाचे हे उपायानं उजळेल नशीब, पैशानं भरेल तिजोरी

लिंबाच्या सालीपासून पावडर बनवा

लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असते जे चरबी कमी करण्यास मदत करते. लिंबाच्या सालीचे सेवन करण्यासाठी वाळवून त्याची पावडर तयार करा. ही पावडर हवा बंद डब्यात साठवा. ही पावडर कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता.

असे तयार करा ड्रिंक 

वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीसह वजन कमी करणारे ड्रिंक तयार करू शकता. हे ड्रिंक बनवण्यासाठी लिंबाची साले काढा आणि नंतर 2 लिटर पाण्यात सुमारे 30 मिनिटे उकळा. त्यानंतर गॅस बंद करून साले काढा. हे वजन कमी करणारे ड्रिंक रोज सकाळी प्या.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी